शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“Show must go on म्हणणं सोपं आहे?”, पूर्णा आजींना जाऊन चार दिवस होताच जुई गडकरीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाली, “शेवटचा व्हिडीओ…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 20, 2025 | 10:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jui gadkari emotional post

"Show must go on म्हणणं सोपं आहे?", पूर्णा आजींना जाऊन चार दिवस होताच जुई गडकरीला येतेय आठवण, भावुक होत म्हणाली, "शेवटचा व्हिडीओ…"

jui gadkari emotional post : काही आठवणी या कडू असतात. विशेषतः एकाद्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातून अचानक जाणे हे पचवता येणे कठीण. तरीही त्यांच्याबरोबरच्या आठवणीत रमत आपण दिवस काढत असतो. अशातच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने साऱ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत काम करत होत्या. त्यामुळे मालिकेतील सहकलाकारांबरोबर त्यांचं खास बॉण्ड असल्याचं नेहमीच पाहायला मिळालं. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळाली.

ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मालिकेतील आणि सिनेसृष्टीतील कलाकारही त्यांना शेवटचे पाहण्यासाठी पुणे येथे पोहोचले. मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हीदेखील पूर्णा आजींना शेवटचे पाहण्यास पोहोचली. यावेळी ती ढसाढसा रडताना दिसली. शिवाय सोशल मीडियावरही तिने भावुक पोस्ट शेअर करत ज्योती यांना श्रद्धांजली वाहिली. जुई आणि ज्योती यांचा ऑनस्क्रीन बॉण्ड चांगला नसला तरी ऑफस्क्रीन त्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.

आणखी वाचा – लग्नाआधी नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली प्राजक्ता गायकवाड, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

जुईच्या सेटवरील बीटीएस व्हिडीओमध्ये त्या नेहमीच दिसायच्या. आता त्यांना जाऊन चार दिवस झाले असले तरी जुईला ज्योती यांची म्हणजेच पूर्णा आजीची आठवण सतावत आहे. त्यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर करत जुईने म्हटलं, “Show must go on किती सहज म्हणतात ना हे वाक्य हल्ली. पण खरंच इतकं सोपं आहे का ते? इतकं सहज मूव ऑन करणं? जेवणाच्या टेबलवर आता रोज दुपारी गोड खाण्यावरुन भांडण होणार नाही. मृत्यू हे जीवनाचे एकमेव सत्य आहे. तरीही आपण ते स्वीकारायला तयार नाही”.

आणखी वाचा – १० वेळा तरी हनुमान चालिसा म्हणाले आणि…; भर पावसात प्रवासादरम्यान झाले अमृता खानविलकरचे हाल, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

याशिवाय जुईने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांच्यबरोबरचा शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी नुकत्याच झालेल्या महासंगम शुटवेळी काढला होता. या व्हिडीओसह कॅप्शन देत तिने म्हटलं की, “आमचा एकत्र शेवटचा व्हिडीओ. खरंच?. महासंगमची रात्र. माझ्याच वयाची मैत्रीण”.

Tags: emotional postjui gadkariJyoti chandekar death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Tejaswini Pandit emotional

"माझी आई मला आणून द्या", आईच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना, दुःखातून सावरणं झालंय कठीण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.