सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१० वेळा तरी हनुमान चालिसा म्हणाले आणि…; भर पावसात प्रवासादरम्यान झाले अमृता खानविलकरचे हाल, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2025 | 2:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
amruta khanvilkar travel

१० वेळा तरी हनुमान चालिसा म्हणाले आणि...; भर पावसात प्रवासादरम्यान झाले अमृता खानविलकरचे हाल, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

amruta khanvilkar travel : महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघरमध्येही पावसाने हाहाकार माजवला आहे. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर पावसाचा जोर पाहता नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वा आपातकालीन स्थितीतच घराबाहेर पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदाच्या दहीहंडीचा उत्सवही अगदी धुमधडाक्यात आणि वरुन राजाच्या उपस्थितीत पार पडला. अनेक कलाकार मंडळीही दहीहंडीनिमित्त कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी शहराबाहेर गेले होते. आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात पावसाने त्यांची बरीच तारांबळ उडाली.

यापैकीच एक म्हणजे अमृता खानविलकर. अमृतालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. बाहेरहुन मुंबईत परतताना अमृताला पावसामुळे बराच त्रास सहन करावा लागला. अमृता सकाळी विमान प्रवास करून मुंबईत परतली. या प्रवासाविषयी अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. विमानतळावरच अमृताचे अनेक हाल झाले आहेत. आणि मुंबईत येताच पावसानेही तिची चांगलीच तारांबळ झाल्याचं तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा – घरातील स्त्रियांना रुग्णालयात जाण्यास बंदी, मासिक पाळी येत नव्हती म्हणून…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “साधारण १० वेळा हनुमान चालिसा पठण करुन मी पोहोचले आहे. आता इथून घरी जाण्यासाठी कोणाची होडी वगैरे मिळणार आहे का? प्रवास सुरुच आहे. माझी फ्लाइट सकाळी ७ वाजता होती. त्या फ्लाइटने टेकऑफ केले ९:३० वाजता. त्यानंतर जवळपास पाऊण ते एक तास मी विमानातच होते. आता विमान लँड झालंय. आता विमानतून उतरल्यावर आम्हाला बस मिळाली आहे, मग सामान मिळणार. त्यानंतर टॅक्सी किवा रिक्षाने भर पावसात घरी जायचंय. एकंदर BE NOW काय प्रवास सुरुच आहे”.

आणखी वाचा – ‘३ इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शेवटी अमृताने साऱ्यांना आवाहन करत म्हटलं की, “मी सर्वांना एवढंच सांगेन, आज घराबाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या. घरात थांबा”. सध्या अमृताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमृताप्रमाणे इतर मराठी कलाकारांनी सुद्धा मुंबईकरांना सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Tags: amruta khanvilkaramruta khanvilkar travelmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
prajakta gaikwad pandharpur photo

लग्नाआधी नवऱ्यासह देवदर्शनामध्ये रमली प्राजक्ता गायकवाड, थेट पंढरपुरात जात विठुरायाचं घेतलं दर्शन, फोटोंनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.