टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ नेहमी चर्चेत असते. या मालिकेतील अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. जेठालाल, दयाबेन, बापुजी आशा अनेक व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र मधल्या काळामध्ये अनेक कलकारांनी या मालिकेला रामराम केला. मि.सोढी, डॉ.हाती, सोनू, टप्पू असे अनेक कलाकार बदलले दिसले. तसेच अनेक कलाकारांच्या आयुष्यातील अनेक गंभीर प्रसंगदेखील समोर आलेले पाहायला मिळाले. अशातच आता एका कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. याबद्दल तिने स्वतः भाष्य केले आहे. (navina bole divorce)
‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये बावरी ही भूमिका सकारणारी अभिनेत्री नविणा बोलेने पती जीत करनानीपासून वेगळी होणार आहे. काही महिन्यांपासून ती पतीपासून वेगळी राहत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने घटस्फोटाचे कारणदेखील सांगितले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत देताना नविणाने सांगितले की, “जीत व मी गेल्या तीन महिन्यांपासून वेगळे राहत आहोत. लवकरच कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात येईल. आम्ही आमची पाच वर्षाची मुलगी किमायराचा सांभाळ एकत्रितपणे करत आहोत”.
पुढे ती म्हणाली की, “जीत मुलीबरोबर आठवड्यातील दोन दिवस भेटतो. आम्ही एकमेकांच्या संमतीने एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. एकत्र राहून दु:खी राहण्यापेक्षा वेगळे राहून सुखाने आयुष्य जगू. जीत व मी लग्नाच्या सुरुवातीला खूप खुश होतो.मात्र नंतर सगळं बदलू लागलं. वैवाहिक आयुष्यात एकमेकांबरोबर बोलत राहणे आणि एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे”.
नविणा व जीत यांनी एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर २०१७ साली दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांनी किमायरा नावाच्या मुलीला जन्म दिला. मात्र अंतर्गत मतभेदांमुळे दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतर मुलीचा सांभाळ दोघं एकत्रितपणे करणार आहेत. नविणाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती ‘तारक मेहता…’ या मालिकेमध्ये ‘बावरी’च्या भूमिकेत दिसून आली होती. या व्यतिरिक्त ती ‘सीआयडी’, ‘अदालत’, ‘इश्कबाज’, व ‘मिले जब हम तुम’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून आली आहे.