Bigg Boss Marathi Season 5 : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस’ मराठीचया पाचव्या पर्वाची चर्चा सुरु आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून यामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाईदेखील पाहायला मिळत आहे.भांडण, हाणामारी, शाब्दिक वादावादी यामुळे या कार्यक्रमाला अधिक रंगत चढलेली आहे. दरम्यान या घरात आता दोन टीम तयार झाल्या आहेत. टीम ए मध्ये अरबाज पटेल, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर व श्याम दरवडे ही कलाकार मंडळी आहेत. या टीममध्ये सुरुवातील निक्की तांबोळीदेखील होती. मात्र तिने या टीममधून एक्झिट घेतली.
या आठवड्यातील ‘भाऊचा धक्का’ हा कार्यक्रम विशेष गाजला. मागील आठवड्यात जे काही घडलं त्याचा पाठपुरावा रितेश देशमुखने संगळ्यांसामोर केला. स्पर्धकांची शाळा घेतल्यानंतर स्पर्धकांमध्ये फुट पडलेलीदेखील दिसून आली. यावेळी आधी टीम ए मध्ये असलेल्या निक्कीचा चेहरा समीर आला. या टीममधून बाहेर पडल्यानंतर निक्कीने टीम बी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी बी टीममधील स्पर्धकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करते. अशातच डीपीने आर्याकडे निक्की व तिच्यामध्ये काय संवाद झाला? अशी विचारणा केली. दरम्यान यावरुन आता टीममध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून नवीन प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये डीपी व टीममध्ये मतभेद झाल्याचे दिसून आले आहे. सर्व स्पर्धक बोलताना दिसत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अंकिता डीपीलं विचारत आहेत की, “तुम्ही निक्कीला का विचारलं की आर्या काय बोलली ते? त्यावर धनंजय हो म्हणाला. असे का केले? असे विचारले असता डीपी म्हणाला की माझी मर्जी. त्यावर अंकिता म्हणाली की, निक्की मला म्हणाली की दादा असं मागून का विचारत आहेत? जे आहे ते समोर विचारावं. त्यानंतर डिपी म्हणाला की मी विचारायला गेलो नव्हतो. निक्की स्वतः माझ्याकडे आली त्यावेळी आम्ही बोलताना मी सहज विचारलं की तुमच्यामध्ये एवढं काय बोलणं सुरू होतं. सतत एकमेकींच्या विरोधात असणाऱ्या काय बोलत असतील? याची उत्सुकता होती त्यामुळे मी सहज विचारले की तुमच्यामध्ये काय बोलणं झालं?
हा प्रोमो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, “डिपी दादा सगळ्यांमध्ये आग लावायची कामं करतात. गेम तर त्यांचा दिसत नाही”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “डिपी म्हणजे नक्की धनंजय पवार की डुप्लीकेट”, त्यानंतर अजून एकाने म्हंटले की, “टीम बी नुसती बालिश बुद्धी आहे”. तसेच अनेकांनी अंकितालादेखील ट्रोल केले आहे. एकाने म्हंटले आहे की, “अंकिताला बाहेर पाठवा. हे ‘बिग बॉस’ आहे. ही स्वतः बिग बॉस होण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अजून एकाने म्हंटले की, “आर्या व अंकिता अतिआगाऊ आहेत. त्या स्वतः सगळीकडे जातात आणि दुसरं कोणी कुठे गेलं की लगेच प्रश्न विचारतात. धनंजय दादा बरोबर बोलले.माझी मर्जी”.