Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून दोन स्पर्धकांची चांगली चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. हे दोन चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजेच निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर. निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. दोघींमधील मैत्रीचा बॉण्डही पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाला. अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीची पाठराखीन बनून जान्हवी घरात वावरू लागली. निक्की जशी वागेल तसं जान्हवीही वागू लागली. मात्र भाऊच्या धक्क्यावर निक्कीने टीम A मधून एक्झिट घेतली.
जान्हवी व निक्की यांच्या मैत्रीत दुरावा आला. मैत्री होती तेव्हा अनेकांनी निकीची सावली म्हणत तिला ट्रोल केलं. निक्कीने अपमान केला तर जान्हवीनेही मराठीतील दिग्गज कलाकार मंडळींचा अपमान केला. यावरुन रितेश देशमुखने जान्हवीची चांगली शाळा घेतली. काही दिवसांपूर्वी जान्हवीने पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे यांच्या अभिनय कारकीर्दीवरुन केलेलं भाष्य अनेकांना खटकलं. साऱ्या महाराष्ट्रातून जान्हवीला ट्रोल करण्यात आलं. शिवाय रितेश देशमुखने ही जान्हवीला यावरुन चांगलच झापलं. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीची शाळा घेत तिला शिक्षा म्हणून जेलमध्ये बंद केलं.

एक आठवडा तुम्ही या जेलमध्येच राहाल आणि आज व उद्याचा भाऊचा धक्का तुम्ही बसणार नाही असं म्हणत तिला जेलमध्ये पाठवलं. सध्या जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात जेलमध्ये बंदिस्त असलेली पाहायला मिळतेय. दरम्यान जान्हवीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट वायरल होत आहे की, “पिंजऱ्यातून बाहेर आल्यानंतर जखमी वाघीण पहिली शिकार कोणाची करणार?”, हा प्रश्न विचारत ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे आणि यावर अनेक कमेंट्स आलेल्या पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्य-प्रीतममध्ये दुरावा, प्रियाबरोबरच नात समोर आलं आणि…; मालिकेत मोठा ट्विस्ट
या पोस्ट खाली अनेकांनी कमेंट करत निक्की तांबोळी असं म्हणत जान्हवीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळतोय. तर काहींनी जान्हवीला ट्रोल केलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान सदर पोस्ट जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत असं म्हटलं आहे की, “निक्कीची करावी हिच अपेक्षा आहे. कारण तिच्या टक्करचा आवाज फक्त जान्हवीमध्येच आहे”. एकूणच किरण किल्लेकर यांनी जान्हवीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.