Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’ सुरू होऊन आता जवळपास एक महिना व्हायला आला आहे. दिवसेंदिवस या घरातील खेळामध्ये रंगत येऊ लागली आहे. घरातील स्पर्धकांना टास्क कळायला लागल्यामुळे आता प्रत्येकजण मेहनत घेत टास्क खेळत आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. आता संपूर्ण आठवडाभर घरात मानकाप्याची दहशत असणार आहे. या दहशतीमुळे ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना एकटं फिरण्यास मनाई केली आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
या आठवड्यात घरात सगळीकडे भूताची थीम बनवण्यात आली आहे. याशिवाय घरातल्या सगळ्या लाइट्स चालू-बंद करण्यात आल्या. यामुळे सगळेच सदस्य मनात नेमकं काय होतंय हा विचार करून बैचेन झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. एकट्याने फिरण्यास मनाई आहे असं ‘बिग बॉस’कडून स्पष्ट करण्यात आलं. आता यासाठी घरात ‘बिग बॉस’कडून सगळ्या स्पर्धकांच्या जोड्या तयार करण्यात आल्या आहेत. अभिजीत व निक्कीची अपेक्षेप्रमाणे पहिली जोडी ‘बिग बॉस’ने जाहीर केली. अभिजीत/निक्कीच्या जोडीमुळे अरबाजला मनात दुःख किंवा वाईट वाटलं आहे की काय असं वाटत आहे आणि याचं कारण म्हणजे नुकताच समोर आलेला नवीन प्रोमो…
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मधील सायलीवर शस्त्रक्रिया, शूटला सुरुवात करताच म्हणाली, “शूट थांबलं नाही पण…”
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यातून निक्की-अभिजीतची जोडी त्याला पसंत पडली नाही आणि त्यामुळे त्याला वाईट वाटत आहे. या नवीन प्रोमोमध्ये अरबाज निक्कीला “तू हसत आहेस?” असं म्हणत किचनमधील डिश जोराने आपटत आहे. यानंतर निक्की “काय बालिशपणा आहे?” असं म्हणते. यावर अरबाज “तू मला hurt करत आहेस” असं म्हणतो. यावर निक्कीही “तुला माझी गरज नाहीये” असं म्हणते. तिच्या या बोलण्यावर अरबाजही “तुझं हे वागणं बघून तर नाहीये” असं म्हणतो. यानंतर निक्की त्याला “गरज नाहीये हे स्पष्ट बोलायचं” असं म्हणत निघून जाते. मात्र अरबाजला राग अनावर न झाल्याने तो रागाच्या भरात खुर्ची उचलून आपटतो. त्याचा हा रुद्रावतार बघून घरातील सर्वचजण गोंधळून जातात.
दरम्यान, गेले काही दिवस अभिजीत व निक्की यांची वाढती जवळीक अरबाजसह घरातील इतर स्पर्धकांनाही खटकत आहे. अरबाजने याबद्दल निक्कीला सांगितलेदेखील आहे. मात्र आता टास्कमुळे अभिजीत-निक्की दोघे एकमेकांच्या सतत जवळ राहत असल्याने अरबाजला हे सहन होत नाहीये. तसेच भाऊच्या धक्क्यावर “इथून पुढे मी A ग्रुपमध्ये नसेन” असं निक्की तांबोळीने स्पष्ट केलं होतं. यामुळे आता निक्की विरुद्ध टीम A असं समीकरण घरात तयार झालेलं आहे. अशातच अरबाजलादेखील दुःख होत असल्याचे दिसून येत आहे.