बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, आईपण करत आहे एन्जॉय, फोटो पाहून कौतुकाचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 4, 2024 | 4:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
drashti dhami baby look

दृष्टी धामी शेअर केला मुलीचा पहिला फोटो

टेलिव्हीजन अभिनेत्री दृष्टी धामी सध्या खूप चर्चेत आहे. लग्नाच्या नऊ वर्षानंतर तिच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकलीचं आगमन झालं. ‘मधुबाला’ फेम अभिनेत्रीची गरोदरपणाच्या १० व्या महिन्यात प्रसूती झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला. याची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. “ती आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४. स्वर्गातून थेट आमच्या हृदयात. एक नवीन जीवन. एक नवीन सुरुवात”, असे कॅप्शन देत तिने  लेकीच्या जन्माची गुडन्यूज देत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी तसेच मित्र-मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (drashti dhami baby look)

अशातच आता दृष्टीने तिच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तिने हा फोटो शेअर करत दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. दृष्टीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा नवरा नीरज व मुलगी दिसून येत आहे. मात्र तिने बाळाचा चेहरा मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोला सर्वांनीच पसंती दर्शवली आहे. तसेच अनेक कलाकार व नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

आणखी वाचा – सांडपाणी, गटाराच्या पाण्यात उभं राहून शूट अन्…; CIDच्या शूटबाबत दयाचा मोठा खुलासा, म्हणाला, “कधीच तक्रार न करता…”

View this post on Instagram

A post shared by Drashti Dhami ???? (@dhamidrashti)

सोशल मीडियावर दृष्टीने फोटो शेअर केल्यानंतर अभिनेता विक्रांत मेस्सीने शुभेच्छा देत लिहिले की, “खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कुटुंबावर नेहमीच देवाची कृपा राहुदे”. तसेच अमित साध, नकुल मेहता, पूजा गौर यांनीदेखील प्रतिक्रिया देत भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – धनंजय पोवारसाठी अंकिता वालावलकरने कोकणातून पाठवली खास भेट, शेअर केला व्हिडीओ, अनोखं सरप्राइज अन्…

दृष्टीने याआधी १४ जून रोजी गरोदर असल्याची घोषणा केली होती. नीरज व दृष्टी यांनी २०१५ साली लग्न केले. त्यामुळे लग्नाच्या नऊ वर्षानंतर आई होणार असल्याने ती खूपच आनंदी होती. दरम्यान दृष्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘दुरंगा’ या वेबसीरिजमध्ये शेवटची दिसून आली होती. याआधी ती विवियन डिसेनाबरोबर ‘मधुबाला’ या मालिकेत दिसून आली. तसेच ‘सिलसिला- बदलते रिश्तो का’, ‘गीत हुई सबसे पराई’, एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस मे है मेरा दिल’ या मालिकांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली आहे.

Tags: daughter photodrashti dhamisocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Singham Again Box Office Collection Day 4

'भूल भुलैया ३' व 'सिंघम अगेन'मध्ये कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, कमावले इतके कोटी, जास्त पसंती कोणाला?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.