Singham Again Box Office Collection Day 4 : दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४३.५ कोटींची कमाई करुन जोरदार सुरुवात केलेली पाहायला मिळाली. अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सलामीवीर ठरलेल्या ‘सिंघम अगेन’ने पहिल्या वीकेंडमध्ये प्रेक्षकांवर आपली जादू दाखवली. या चित्रपटाबरोबरच कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. मात्र, या संघर्षानंतरही ‘सिंघम अगेन’ची कमाई सुनामीसारखी वाढतच राहिली. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४३.५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या व्यवसायाशी संबंधित प्रारंभिक आकडेही समोर आले आहेत. रात्री १ वाजेपर्यंत चित्रपटाने २.५३ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण कमाई १२३.५३ कोटी रुपये इतकी झाली आहे. हा चित्रपट अजय देवगणच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर असण्याबरोबरच पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. याबरोबरच हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ‘शैतान’, ‘सिंघम रिटर्न्स’ आणि ‘दृष्यम २’ सारख्या चित्रपटांची एका आठवड्याची कमाई केली आहे.
आणखी वाचा – “सूरजला भाऊबीज केली नाही का?”, प्रश्न विचारताच जान्हवी किल्लेकरचं थेट उत्तर, बारामतीत जाणार का?
अजय देवगणच्या सिंघम अगेनने पहिल्या वीकेंडमध्ये रु. १२० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया ३’ ने देखील १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दोन्ही चित्रपटांच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईवर नजर टाकली तर, ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’चे आकडे जवळपास समान होते. ‘भूल भुलैया ३’ची प्रगती पाहून असे दिसतेय की, चौथ्या दिवशी प्रेक्षक ‘भूल भुलैया ३’ कडे अधिक आकर्षित होतील, ज्यामुळे ‘सिंघम अगेन’चे नुकसान होऊ शकते. हा चित्रपट ‘सिंघम’ मालिकेतील तिसरा चित्रपट आहे.
अजय देवगण, करीना कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात अक्षय कुमार, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग असे अनेक मोठे चेहरे आहेत. सलमान खानच्या खास कॅमिओने हा चित्रपट आणखीनच खळबळ उडवून देणारा आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या आठवड्याची कमाई चित्रपट किती दिवसात हे बजेट ओलांडू शकतो, हे सांगू शकेल.