छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी (CID) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. १९९८ ते २०१८ पर्यंत म्हणजेच तब्बल २० वर्ष ही मालिका चालली. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ्रेडी यांच्याबरोबरच इतर सर्वच पात्र गाजली. प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या केस सोडवताना प्रेक्षकही टीव्हीसमोर बसून असायचे. ‘कुछ तो गडबड है दया’, ‘दया तोड दो दरवाजा’ हे डायलॉगही प्रचंड गाजले. आता पुन्हा एकदा ही टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकच नव्हे तर मराठीत ही टीम सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहे. शोचा पहिला सीझन तब्बल २० वर्षे चालला. त्यानंतर आता अभिनेता दयानंद शेट्टीने शोच्या शूटिंगबाबत काही खुलासे केले आहेत. (Dayanand Shetty on CID Shooting)
सीआयडीच्या आठवणी सांगताना दयानंद शेट्टी म्हणाले की, “तिथले सगळे एकमेकांशी आदराने वागतात. कोणत्याही लहान-मोठ्या अभिनेत्याला वेगळी वागणूक मिळाली नाही. प्रत्येकाला स्वतंत्र व्हॅनिटी व्हॅन मिळाली असली तरी कलाकार एकच मेकअप रूमचा वापर करायचे. तिथे कोणताही भेदभाव नव्हता. कोणी शो सोडण्याचा विचार करत असला तरी त्याला वेगळी वागणूक मिळाली नाही. आपण सर्व मानव आहोत आणि प्रत्येकाशी आदराने वागतो. हे सैन्यासारखे होते, जिथे प्रत्येकजण आपले काम करत असे आणि कोणीही कोणालाही लहान किंवा मोठे मानत नाही”.
आणखी वाचा – मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यांमध्येच मोडला होता संसार, नक्की काय झालेलं?
पुढे शोच्या शूटिंगबाबत अभिनेता म्हणाला की, “कथेच्या आवश्यकतेनुसार आम्हाला सांडपाणी आणि घाण पाण्यात शिरावे लागले होते. आम्ही दिग्दर्शकाला कधीच सांगितले नाही की आम्ही त्यात उडी मारू शकत नाही. कारण तो गलिच्छ आहे. आपण नकार देऊ शकत नाही. या शोचे लष्करी स्तरावर शूटिंग करण्यात आले. सीआयडीचा मुख्य आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक दिवस वेगळा होता. शूटिंग ठिकाणे आणि आणि सहकलाकार नेहमी बदलत राहिले. कधी मोठ्या कलाकारांबरोबर तर कधी इतर कलाकारांबरोबर शूट करावं लागलं”.
आणखी वाचा – Video : भाचीबरोबर विशाखा सुभेदारांचा बेभान होऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरीही हैराण, कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, ९० च्या दशकातील ही गाजलेली मालिका आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर मराठी सीआयडी (CID) मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून ही मालिका कधी सुरु होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. येत्या ८ नोव्हेंबर पासून शुक्रवार ते रविवार् रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.