हिंदी टेलिव्हीजन मालिका ‘अनुपमा’ सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीदेखील सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने पुन्हा एकदा रुपालीवर आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ईशा वर्मा ही अश्विन वर्मा व पूर्वाश्रमीची पत्नी सपना वर्मा यांची मुलगी आहे. या दोघांचाही २००८ साली घटस्फोट झाला. त्यानंतर २०१३ साली अश्विन यांनी रुपालीबरोबर लग्न केले. त्याच वर्षी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव रुद्रांश ठेवण्यात आले. गेल्या अनेक काळापासून रुपाली व ईशा यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. अशातच आता ईशाची नवीन पोस्ट समोर आली आहे. (esha verma on rupali ganguly)
ईशाने एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने सांगितले की, पैसा व ताकदीमुळे खरं लपवता येत नाही. तिने लिहिले की, “तुम्ही सांगता ते नाही तर तुम्ही जे करता ते तुमचं चरित्र आहे. प्रसिद्धी पैसा व शक्ती हे काही काळापुरतं खरं लपवू शकतात. पण त्यामुळे होणारे नुकसान कधीही भरुन काढता येत नाही. शब्दांमुळे किंवा दिखाव्यांमुळे नाही तर तुम्ही तुमच्या चारित्र्यामुळे ओळखले जाता.तुम्ही ताकदीने उभे राहा आणि विश्वास ठेवा. तुमची कर्म सगळं काही व्यवस्थित करतील”.
तसेच एका पोस्टमध्ये ईशाने लिहिले की, “हे आताच्या प्रतिक्रियांचे उत्तर आहे. मला खूप पुढे जायचं आहे. जर मी खूप पुढे जाऊ शकते म्हणजे माझं पहिलं प्रेम, माझ्या वडिलांपासून दूर आले आहे. आपण सगळेच पुढे जाऊ शकतो. आयुष्य हे विकास, उपचार व त्यावर लक्ष देण्याबद्दल आहे. हे खरच खूप महत्त्वाचे आहे”.
रुपाली व ईशा यांच्यामध्ये वाद तेव्हा सुरु झाले तेव्हा ईशाने रुपालीवर घर तोडल्याचा आरोप केला होता. तिने अभिनेत्रीला ‘अपमानित व घर तोंडणारी बाई म्हणूनही संबोधले. यानंतर रुपालीने ईशाच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावादेखील दाखल केला होता.