Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. अवॉर्ड फंक्शनसाठी पारू अनुष्का व आदित्य जायला निघालेले असतात. त्यावेळेला पारू आदित्यच्या बोलण्यानं दुखावते. आदित्यने पारुला नोकर असं संबोधलेलं असतं. ही गोष्ट पारूच्या मनात सतावत असते आणि त्यामुळे ती आदित्यला प्रचंड त्रास देताना दिसते. तर इकडे अनुष्काने तिचा डाव रचलेला असतो. गुरुजी अहिल्यादेवींच्या घरी जाऊन अनुष्का व आदित्यची पत्रिका पाहणार असतात हे अनुष्काला कळालेलं असतं त्यामुळे ती हैराण होते आणि काही करुन गुरुजी अहिल्यादेवींच्या घरी पोहोचायला नको असं ती ठरवते आणि त्यानुसार ती सगळी सोय करते. मोहन गुरुजींना घेऊन घरी जात असतो त्या वेळेला गुरुजींच्या गाडीचा अपघात होता होता राहतो तर इकडे अनुष्काने आदित्य वरील हमल्याचाही कट रचलेला असतो.
वाटेत जात असतानाच त्यांची गाडी पंचर होते त्यावेळेला पारू आदित्यला म्हणते तुम्हाला तर गाडीचा पंचर काढायला येतो ना?. आपण गाडीचा पंचर काढून पुढे जाऊ असे म्हणत असते. तेव्हाच आदित्य देखील पारूची खोड मोडायला म्हणून म्हणतो की, तू तर आमची आमची नोकर आहेस ना त्यामुळे गाडीचा पंचर देखील नोकरांनीच काढायला हवा आणि तो अनुष्काला घेऊन बाजूला जातो. त्यामुळे पारूचा चांगलाच पचका होतो आणि पारू आता गाडीचा पंचर कसा काढायचा या विचारात हातात पाने घेऊन उभी असते. त्याच वेळेला तिथून एक प्रेमीयुगुल जात असतो. पारू त्याच्याकडे मदत मागते तेव्हा तो सांगतो की, हो मी या मदतीसाठी आलो आहे आणि तो हसत असतो.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरने लिहिलं ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचं प्रोमो सॉंग, नवऱ्यासह व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
त्याच्या ॲक्शन, त्याच्या स्वभावानं आणि त्याच्या मिश्किल अंदाजानं पारू त्याच्यावर खूपच इम्प्रेस होते आणि हसू लागते. मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री झाली असून आता हे नवपात्र कोणत्या पद्धतीने मदत करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. इतकंच नव्हे तर मालिकेच्या समोर आलेल्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, गुरुजी अहिल्यादेवींना सांगतात की, आदित्याची होणारी बायको ही गरीब कुटुंबातील असेल आणि ती आई विना वाढलेली पोर असेल. हे ऐकताच अहिल्यादेवी म्हणतात आईविना वाढलेली पोर ही अनुष्का आहे मात्र ती श्रीमंत घरातील आहे. मग हे कसं शक्य आहे.
यावर गुरुजी म्हणतात, मला जे दिसलं तेच मी सांगतोय. त्यानंतर दामिनी मध्येच म्हणते, आईविना वाढलेली पोर आणि गरीब घरातील पोर म्हणजे पारू तर नाही ना, हे ऐकल्यावर अहिल्यादेवी डोळे मोठे करुन तिच्याकडे पाहू लागतात. आता अहिल्यादेवी पारूला त्यांची सून म्हणून स्वीकारतील का हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.