दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते वेंकटेश दग्गुबाती आणि महेश बाबू त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. जेव्हा त्यांच्या चित्रपटाची घोषणा होते, तेव्हापासूनच चाहत्यांना त्यांच्या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागलेली असते. इतकेच नव्हे, तर दोघांच्या विविध कार्यक्रमांमधील फोटोज सोशल मीडियावर बरेच धुमाकूळ घालतात. मात्र, आता हे सुपरहिट अभिनेते एका वेगळ्या कारणांमुळे जोरदार चर्चेत आले आहे. महेश व वेंकटेश हे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. त्यावेळी हे दोघे पत्त्यांचा खेळ खेळताना दिसले. दरम्यान, सोशल मीडियावर हे फोटोज व्हायरल होताच नेटकरी अभिनेत्याला जोरदार ट्रोल करत आहे. (Venkatesh and Mahesh Babu playing a poker game viral video)
हैद्राबाद येथील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या क्लब हाऊसचे उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी या अभिनेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. दरम्यान, याच सोहळ्यातील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यातील एका फोटोमध्ये वेंकटेश आणि महेश बाबू पत्त्यांचा खेळ खेळताना दिसतात. एका टेबलमध्ये हे दोघे त्यांच्या मित्रांसह बसले असून त्या टेबलवर काही नोटा आणि दारूचा ग्लास दिसत आहे. वेंकटेशने यावेळी काळ्या रंगाचा टीशर्ट व जॅकेट परिधान केला होता. तर महेशने नारंगी रंगाचा स्वेटशर्ट परिधान केला होता. पत्त्यांच्या खेळ खेळताना दोघंही चांगल्या मूडमध्ये दिसत होते.
हे देखील वाचा – दहा वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडबरोबर विवाहबंधनात अडकणार रणदीप हुड्डा, कोण आहे अभिनेत्याची होणारी बायको?
#MaheshBabu #Venkatesh pic.twitter.com/wd1tSz3L8t
— TollywoodBoxoffice.IN (@TBO_Updates) November 5, 2023
अभिनेत्यांचे पत्त्यांच्या खेळ खेळतानाचे फोटोज सोशल मीडियावर समोर येताच नेटकऱ्यांनी या दोघांना जोरदार ट्रोल करत आहे. असं असलं तरी, दुसरीकडे दोन्ही अभिनेत्यांचे चाहते त्यांना समर्थन करताना दिसतात. त्याचबरोबर, त्यांच्यावर अनेक मीम्सदेखील चांगलेच व्हायरल होत आहे. वेंकटेश आणि महेश बाबू यांनी २०१३ मध्ये आलेल्या ‘सीताम्मा वकितलो सिरीमल्ले चेट्टू’ नावाचा कौटुंबिक चित्रपट केला होता. त्याचबरोबर ते अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झालेले आहे.
हे देखील वाचा – तीन वर्षातच पहिल्या नवऱ्यापासून विभक्त अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह उरकलं दुसरं लग्न, फोटो समोर
#MaheshBabu's pics viral across all social media.
— V (@Vidya18) November 5, 2023
As you all know, negativity speads more fast and easily but the fact is that he is for opening the club, not to play it.
Both Chinnodu & Peddodu are good at heart actually.#MaheshBabu𓃵#Venkatesh pic.twitter.com/WfCFskLjxX
दरम्यान, दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास महेशचा ‘गुंटूर करम’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसंच, तो ‘RRR’ फेम दिग्दर्शक एसएस राजमौली यांच्या चित्रपटातही झळकणार असल्याचं बोलला जात आहे. तर वेंकटेश सध्या ‘सैंधव’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ज्यात त्याच्यासह बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हे दोनही चित्रपट येत्या मकरसंक्रांतीला प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.