बॉलिवूडमधील दर्जेदार अभिनय साकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. आजवर चित्रपटात मोजक्याच भूमिका करत त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सरबजीत’, ‘लव्ह आज कल’, ‘लाल रंग’, ‘हायवे’ सारख्या दर्जेदार चित्रपटांतून त्याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रणदीपचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता त्याच्याशी निगडीत एक खुप मोठी बातमी समोर आली आहे. रणदीप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याची मैत्रिण लीन लैश्राम हिच्याबरोबर तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (randeep hooda is marrying long time girlfriend)
नोव्हेंबरच्या शेवटी हे जोडपं लग्न बंधनात अडकणार असल्याचं ‘इ टाईम्स’च्या नुकत्याच आलेल्या अहवालात समोर आलं आहे. एका सूत्राने या माहितीबाबत तारिख न सांगता बातमीची पुष्टी केली आहे. सुत्रांनूसार, “हे लग्न अतिशय खाजगी स्वरुपात असणार आहे. हा सोहळा मुंबईत होणार असून यात फक्त घरचे कुटुंबीय व जवळचा मित्र परिवार सहभागी होणार आहेत”.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “रणदीप हुड्डा एक खासगी व्यक्ती आहेत. त्याला त्याच्या लग्नात मीडियाचं लक्ष वेधायचं नाही. लग्न संपन्न झाल्यानंतर त्याची घोषणा करण्यात येणार आहे. रणदीप व लिन यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही. पण त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टने त्यांच्या नात्याची पुष्टी दिली आहे. रणदीपने २०२१मध्ये लिनच्या वाढदिवशी पहिल्यांदा त्यांच्या नात्याबाबत पुष्टी केली होती. तेव्हा रणदीपने लिनला हॉट फज म्हटलं होतं”.
लिन ही मुळची मणिपूरची असून ती एक मॉडेल आहे. तिचं सध्याच वय ३७ असून रणदीपचं वय हे ४७ वर्षे इतकं आहे. लिन लैश्रायनेही रणदीपला त्याच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचा सफारीदरम्यानचा फोटो पोस्ट करत तिने ‘हॅपी बर्थडे माय हॉट फज’, असं लिहिलं होतं. या फोटोत दोघेही बेज शर्ट, कॅप व गळ्यात स्कार्फ घातलेला दिसत आहे. रणदीप लवकरच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तो स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा तोच सांभाळताना दिसत आहे.