‘बिग बॉस’ मराठीमुळे प्रकाशझोतात आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे. या जोडीने ‘बिग बॉस’ मराठीमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा मिळवली. तसेच ‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रसाद व अमृतामध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. प्रसादने तर अमृतावर असणारं प्रेम ‘बिग बॉस’च्या घरातचं बोलून दाखवलं. पण ‘बिग बॉस’ पुरतंच दोघांचं प्रेम मर्यादित राहिलं नाही. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रसाद व अमृताच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (Amruta Deshmukh and Prasad Jawade)
सुरुवातीला प्रसाद व अमृता यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. त्यानंतर थेट साध्या पद्धतीने साखरपुडा सोहळा उरकत त्यांनी त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. आता लवकरचं ही जोडी एकमेकांच्या आयुष्याचे साथीदार बनण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या काही दिवसांतच त्यांचं लग्न होणार आहे. सध्या लग्नाची जोरदार तयारीही सुरु असलेली पाहायला मिळतेय. लग्नात ते डान्स करणार असून सध्या ते डान्सची तयारी करत आहेत. याचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरून शेअर देखील केले होते.
अमृता – प्रसादची लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या या दोघांच्या केळवणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याआधी त्यांच्या केळवणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याआधी अमृताच्या आजोबांनी त्यांच्या केळवणाचे आयोजन केले होते. त्यानंतर आता आणखी एका केळवणाच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमृता-प्रसादच्या या केळवणाचे आयोजन अमृताच्या भावाने म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी कृतिका देव हिने केलं आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे अभिनेता अभिषेक देशमुखला लोकप्रियता मिळाली. सध्या अभिषेक बहिणीच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त आहे. नुकतंच अभिषेकने अमृता व प्रसादला केळवणासाठी घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी मॉडर्न व पारंपरिक अंदाजात हे केळवण केले. पणत्यांची आरास करत त्यांना मोमोज खाऊ घातले. शिवाय चौघांनी एकत्र फोटोही काढले. अभिषेक व अमृता यांच्या बहीण भावाच्या नात्याबद्दल साऱ्यांनाच माहित आहे. दोघांचं घट्ट बॉण्डिंग असलेलं नेहमीच पाहायला मिळतं.