शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 18 : दोन दिवसांमध्ये सुरु होणार ‘बिग बॉस’चं नवं सीझन, सलमान खानच्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, मोठा ट्वीस्ट

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 4, 2024 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss hindi new promo

सलमान खानने शेअर केला 'बिग बॉस'चा नवीन प्रोमो

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’चे आता १८ पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो ६ ऑक्टोबरपासून पाहायला मिळणार असून या प्रीमियरच्या आधी अभिनेता सलमान खानने नवीन प्रोमो शेअर केला आहे. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात नक्की किती गोंधळ होणार आहे? हे सांगताना तो दिसत आहे. तसेच नवीन शो आहेच पण नवीन तांडव पण बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’चे प्रेक्षक खूप खुश झाले असून या प्रोमोला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे व अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. त्यामुळे आता येत्या नवीन पर्वात काय धमाल होणार हे पाहने औत्सुक्याचे ठरणार आहे. (bigg boss hindi new promo)

गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस’ची चर्चा सुरु आहे. या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दलदेखील अनेक अंदाज बांधले गेले. अशातच आता सलमान शेअर केलेल्या व्हिडीओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “६ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता बघा”. तसेच प्रोमोमध्ये म्हणत आहे की, “हे डोळे बघतही होते आणि दाखवतही होते. पण आता फक्त आजची परिस्थिती”.

आणखी वाचा – “घराबाहेर येताच मी तिला भेटणार आणि….”, पॅडींच्या अपमानावरुन विशाखा सुभेदार जान्हवीला खडसावणार, म्हणाल्या, “तिचं खोटं नाटक…”

Watch Bigg Boss starting 6th Oct @9pm @ColorsTV pic.twitter.com/J2vrConbgg

— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 4, 2024

पुढे तो म्हणत आहे की, “आता असे डोळे उघडणार की इतिहासच लिहिला जाणार, तसेच बघणार उद्याचाही दिवस. विज्ञानाचा प्रलय, काळाचे दरवाजेही उघणार. प्रत्येक षड्यंत्र फिके पडणार. हे डोळे असे की प्रत्येकाची नियत बिघडणार. या वर्षी ‘बिग बॉस’ बघणाऱ्यांचे भविष्य कोण बदलणार त्यांचे डिजिटल भविष्य. बघा. आता होणार वेळेचं तांडव”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : ग्रँड फिनालेसाठी रितेश देशमुख पुन्हा येणार, रंगणार भाऊचा धक्का, म्हणाला, “सदस्यांना मोठा धक्का मिळणार आणि…”

‘बिग बॉस’च्या घरात अनेक दिग्गज कलाकार दिसून येत आहे. तसेच कार्यक्रमातील एका सदस्याचा प्रोमोदेखील समोर आला. या प्रोमोमध्ये अभिनेत्री शिल्पा शिरोडकर दिसून येत आहे. शिल्पाने टेलिव्हिजनसहित अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री निया शर्मादेखील या नवीन पर्वात दिसणार आहे. तसेच ‘ये रिश्ता…’ मालिकेतील शहजादा धामीदेखील ‘बिग बॉस १८’ मध्ये दिसून येणार आहे. तसेच अजून कोण असणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags: bigg bosshindisalman khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla marathi serial update Leela will express her love for AJ new promo viral on social media

Navri Mile Hitlerla : ऐजेंना प्रपोज करण्यासाठी लीलाची तयारी, एक दिवसही त्यांच्याशिवाय करमेना, प्रेमाचा स्वीकार करणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.