Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील १०० दिवसांचा हा प्रवास ७० दिवसांवर आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर या रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा संपन्न होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होईल याची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. येत्या रविवारी ६ ऑक्टोबर रोजी पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. कालच्या एपिसोडमध्ये वर्षा उसगांवकर एलिमिनेट झाल्या आणि ‘बिग बॉस’मधील टॉप ६ सदस्यांची नावं समोर आली.
अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर व अंकिता प्रभू वालावलकर हे बिग बॉसमधील सहा फायनलिस्ट आहेत. यांच्यापैकी एक जण आज घराबाहेर जाणार, असं प्रोमोवरुन दिसतंय. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ स्पर्धकांना सूचित करत आहेत की, “बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील टॉप ६ फायनलिस्ट मी जाहीर केले आणि इथेच येतो आहे ट्विस्ट. आता आपल्याला कळेल टॉप ५”, हे ऐकून साऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.
यानंतर आता आणखी एक प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख बोलताना दिसत आहे. रितेश भाऊच्या धक्क्याची व महाअंतिम सोहळ्याची आठवण करुन देत आहे. रितेश असं बोलताना दिसत आहे की, “चक्रव्हुह भेदून आता मिळाले आहेत या सीझनचे सुपर सहा, पण खेळ अजून संपला नाही आहे मित्रांनो. कारण या सुपर सहांना मिळणार आहे या सीझनचा सगळ्यात मोठा धक्का, तेव्हा न चुकता ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले पाहा ६ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता”, यावेळी व्हिडीओमध्ये स्पर्धकांचा प्रवास पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – इतक्या सुंदर व गोंडस दिसतायत रुबिना दिलैकच्या जुळ्या मुली, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, नावंही आहेत खूप खास
एकूणच ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी ‘ सीझन पाचचा ग्रँड फिनाले सायंकाळी ६ वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर संपन्न होणार असल्याचे समोर आले आहे. हा ग्रँड फिनाले अभिनेता रितेश देशमुखचं होस्ट करणार आहे. गेले दोन आठवडे रितेश हा चित्रीकरणानिमित्त परदेशात होता त्यामुळे तो भाऊच्या धक्क्यावर येऊ शकला नाही. मात्र आता तो ग्रँड फिनालेला येत स्पर्धकांना भाऊचा धक्का देणार असल्याचं समोर आलं आहे.