टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’चे आता १८ पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो ६ ऑक्टोबरपासून पाहायला मिळणार असून या प्रीमियरच्या आधी अभिनेता सलमान खानने नवीन प्रोमो शेअर केला आहे. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात नक्की किती गोंधळ होणार आहे? हे सांगताना तो दिसत आहे. तसेच नवीन शो आहेच पण नवीन तांडव पण बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस’चे प्रेक्षक खूप खुश झाले असून या प्रोमोला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे व अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. त्यामुळे आता येत्या नवीन पर्वात काय धमाल होणार हे पाहने औत्सुक्याचे ठरणार आहे. (bigg boss hindi new promo)
गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस’ची चर्चा सुरु आहे. या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दलदेखील अनेक अंदाज बांधले गेले. अशातच आता सलमान शेअर केलेल्या व्हिडीओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “६ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता बघा”. तसेच प्रोमोमध्ये म्हणत आहे की, “हे डोळे बघतही होते आणि दाखवतही होते. पण आता फक्त आजची परिस्थिती”.
Watch Bigg Boss starting 6th Oct @9pm @ColorsTV pic.twitter.com/J2vrConbgg
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 4, 2024
पुढे तो म्हणत आहे की, “आता असे डोळे उघडणार की इतिहासच लिहिला जाणार, तसेच बघणार उद्याचाही दिवस. विज्ञानाचा प्रलय, काळाचे दरवाजेही उघणार. प्रत्येक षड्यंत्र फिके पडणार. हे डोळे असे की प्रत्येकाची नियत बिघडणार. या वर्षी ‘बिग बॉस’ बघणाऱ्यांचे भविष्य कोण बदलणार त्यांचे डिजिटल भविष्य. बघा. आता होणार वेळेचं तांडव”.
‘बिग बॉस’च्या घरात अनेक दिग्गज कलाकार दिसून येत आहे. तसेच कार्यक्रमातील एका सदस्याचा प्रोमोदेखील समोर आला. या प्रोमोमध्ये अभिनेत्री शिल्पा शिरोडकर दिसून येत आहे. शिल्पाने टेलिव्हिजनसहित अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री निया शर्मादेखील या नवीन पर्वात दिसणार आहे. तसेच ‘ये रिश्ता…’ मालिकेतील शहजादा धामीदेखील ‘बिग बॉस १८’ मध्ये दिसून येणार आहे. तसेच अजून कोण असणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.