Rohini Hattangadi Big Decision : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. चित्रपट, नाटक आणि मालिकाविश्वात अनेक वर्षे सातत्याने काम करणाऱ्या रोहिणी यांनी आता अभिनय क्षेत्राबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. आता त्या मनोरंजनविश्वात काम करणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नुकत्याच ‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी हट्टंगडी यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीवर स्पष्टपणे मत मांडलं आहे. त्या म्हणाल्या की,”आमचं काम एक प्रकारे व्यायाम आहे, पण टेलिव्हिजनसाठी खूप मेहनत आणि खूप वेळ द्यावा लागतो, सकाळी लवकर बाहेर पडायचे आणि रात्री उशिरा पर्यंत शुंटिंग करायचे. रात्री ११ वाजता घरी येयाचं आणि दुसऱ्यादिवशी पुन्हा ६ वाजता शूटिंगसाठी सेटवर जायायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मला व्यायाम करायला, आराम करायला किंवा श्वास घेण्यासाठी ही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी कामाचा वेग कमी केला आणि म्हणूनच मी टीव्ही मालिकांमध्ये काम करणं थांबवलं आहे”.
ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील गोंधळलेल्या नियोजनावरही नाराजी व्यक्त केली. काम उपलब्ध नसल्याचं सांगूनही शेवटच्या क्षणी कलाकारांना फोन येतात. अचानक सीन ठरवून तात्काळ सेटवर येण्याचा दबाव टाकला जातो, असं त्यांनी नमूद केलं. अशा पद्धतीने काम करणं आता शक्य नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आणखी वाचा – माधवी निमकरची छोट्या पडद्यावर एंट्री, शालिनीच्या तोडीस तोड भूमिका आणि…; म्हणाली…
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच रोहिणी हट्टंगडी यांनी ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत पूर्णा आजींच्या भूमिकेत एंट्री घेतली होती. मात्र, आता त्या पुढे या मालिकेत दिसणार की नाही, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. जर रोहिणी हट्टंगडी या भूमिकेत दिसणार नसतील, तर पूर्णा आजींच्या भूमिकेसाठी नवी अभिनेत्री येणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहिणी हट्टंगडी यांनी खरंच ‘ठरलं तर मग’ ही मालिका सोडली आहे का?, यावर सर्वत्र चर्चा रंगली आहे.





