dhananjay powar video : ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा २९ नोव्हेंबर रोजी अगदी थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. चाहत्यांची तुडुंब गर्दी, कलाकारांची मांदियाळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सूरजचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी ‘बिग बॉस’ फेम अनेक कलाकार मंडळी ही उपस्थित असलेले पाहायला मिळाले. दरम्यान, सूरज चव्हाणचा लग्न हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण धनंजय पोवार उर्फ डीपी दादाने सूरज चव्हाणला सोफा गिफ्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि यावरुन लोकांनी कमेंट करत डीपीला जाब विचारला.
यावर आता थेट डीपीने उत्तर देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत डीपीने म्हटलं, “आजचा विषय, सूरजच्या फर्निचरचा आहे. सूरजला मी सांगितलेलं की, तुझ्या घरात सोफासेट असेल तो मी देणार. सोसायटी फर्निचर देणार. दीड महिन्याअगोदर त्याचा मला फोन आलेला, सोफासेटचं काय करणार? मी त्याला म्हटलं, मी सोफासेट पाठवतोय. तू इकडे येणार आहेस का? तुला कोणता हवा आहे? त्यानंतर मी त्याच्याकडे पत्ता मागितला. त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत त्याने मला सांगितलं नव्हतं की, की त्याने बाहेरुन फर्निचर घेतलंय. मला काहीच माहित नाही. मी पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयार करुन घेतला. आणि आज लोकं कमेंट करतायत मतासाठी यांनी असं केलं”.
“आज आम्ही जे काही आहोत, ते स्वतःच्या हिंमतीवर आहोत. त्याला म्हटलं मी देणार होतो. तो म्हणाला, ‘मला दादा देणार आहेत’ आणि याचा जाब सूरजला विचारा ना! मी आजही सोफासेट त्याला द्यायला तयार आहे. माझं त्याच्या भावासोबतही बोलणं झालेलं. कमेंट करताना विचार करायचा. त्याला जर माझ्याकडून नको असेल, त्याला मी काय करु? त्याने पण आम्हाला किंमत द्यायला पाहिजे. त्याने स्वतःहून सांगायला पाहिजे. मला का विचारताय तुम्ही? त्याने मला सांगितलं नाही. लग्नाच्या दिवसापर्यंत त्याने मला लोकेशन, पत्ता काहीच पाठवलं नाही. आणि आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला कशाला कमेंट करायच्या आहेत?”, असं म्हणत कमेंट करणाऱ्याला सुनावलं.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मधून पुन्हा एकदा पूर्णा आजींची EXIT?, रोहिणी हट्टंगडींचा मोठा निर्णय प्रेक्षक नाराज
धनंजयने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “त्याला बाहेरून सोफा मिळाला त्याने घेतला…पण त्याने मला ही कॉल केला होता कसं करुया म्हणून…पण त्याने बाहेर जर सांगितलं होतं, तर ते त्याने मला कळवलं पाहिजे होतं. तरीही त्याने मला लोकेशन पाठवायला पण वेळ लावला (आदल्या रात्री पाठवलं ) जणू आधी मी त्याला हे पण बोललो की लग्नाची गडबड आहे. तेव्हा २/३ दिवस जाऊदे, आपण नंतर पाठवू त्यावर पण तो हा बोलला होता. मी ३/४ वेळेस कॉल केले त्याला अड्रेस पाठव, सोफा बघायला येतोस का? किंवा माप सांग काय आहे हॉलचं, हॉलचे फोटोज पाठव. आता मी यापेक्षा जास्त काय बोलू? कदाचित, आज त्याला कोणीतरी जास्त देतं म्हणून मला विसरला का?”.





