मंगळवार, जून 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 22, 2026 | 4:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Savitribai Jotirao Phule

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

Savitribai Jotirao Phule : अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान मिळविणारी ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान मिळवलेली ही मालिका २० जूनपासून ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. ‘मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच एखादी मालिका अशा स्वरूपात पुनरागमन करत आहे. फुले दांपत्यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेला लढा, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा, हाच या पुनर्प्रवासामागील आमचा उद्देश आहे. ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी चळवळ आहे’, असे या मालिकेच्या डिजीटल प्रवासाबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत असे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा हा डिजीटल प्रवास अनेक निर्मात्यांसाठी पथदर्शी ठरू शकतो. या प्रवासाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमाबद्दल सकारात्मक भावना आणि उत्सुकता निश्चितच आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्तीची आणि मांडणीची अधिक व्यापक संधी उपलब्ध असते. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत कथा ज्या स्वरूपात पोहोचवायची आहे, ती अधिक प्रभावीपणे मांडता येते. तसेच, या विषयाला व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण भविष्यात संसदेतही हा मुद्दा मांडणार असल्याचे संकेत डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले.

आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

‘सध्या ही मालिका सर्वप्रथम ‘मराठी वारसा’ या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर पहायला मिळणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर डिजीटल माध्यमांवर विस्तार करण्याचा आमचा विचार आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून योग्य वेळेनुसार पुढील निर्णय घेतले जातील. येत्या काळात हिंदी, तामिळ, तेलगू, इंग्रजी, बंगाली या पाच विविध भारतीय भाषांमध्ये डब करून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा – बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

डिजीटल माध्यमामुळे कलाकार आणि निर्मात्यांमधील अंतर कमी होत असल्याचे सांगत डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, ‘आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर ऑडिशन टॅब सुरू केला असून, महाराष्ट्रातील नवोदित आणि गुणवंत कलाकारांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कलाकारांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय थेट आमच्याशी जोडता येईल.’ सर्जनशीलतेला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत मालिकेच्या डिजीटल प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शब्दांत सांगितले कि आता ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका केवळ आमची राहिलेली नाही, तर ती आता संपूर्ण महाराष्ट्राची मालिका झाली आहे. “मराठी मनोरंजन क्षेत्रात आशयप्रधान आणि लोकाभिमुख कंटेंटसाठी नवे मार्ग खुले करण्याच्या उद्देशाने आम्ही सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात अनेक सर्जनशील प्रयोगांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sarkate And Nikhil Chava Dance
Entertainment

निखिल-अनुष्का हळदीत बेभान होऊन नाचले, मराठी कलाकारांचाही तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

जून 23, 2026 | 3:30 pm
Anushka Sarkate And Nikhil Chavan
Entertainment

हळद लागली! अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची जोरदार हळद, मंडपातच नवरा-नवरीचा भन्नाट डान्स अन्…

जून 23, 2026 | 2:50 pm
Anushka Sarkate engagement
Entertainment

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा साखरपुडा संपन्न; खास फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

जून 23, 2026 | 10:11 am
Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Next Post
Anushka Sarkate engagement

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा साखरपुडा संपन्न; खास फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.