बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुर्ता-धोतर अन् केशरी नऊवारी साडी; निमिष कुलकर्णी व कोमल भास्कर यांच्या लग्नातील पारंपरिक लुकनं वेधलं लक्ष, कौतुकाचा वर्षाव

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 6, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nimish Kulkarni Wedding Look

लग्नातील पारंपरिक लुकने लक्ष वेधलं

Nimish Kulkarni Wedding Look : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनसराईचा उत्साह पाहायला मिळत आहे. मालिकाविश्वातील अनेक कलाकार आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाची बातमी चर्चेत आली होती. त्यानंतर ‘बिग बॉस’मधून लोकप्रिय ठरलेला सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचा विवाहसोहळा ही पार पडला. याच लगीनघाईत अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या थाटामाटात झालेल्या लग्नाचीही प्रचंड चर्चा झाली होती.

आता या यादीत आणखी एका कलाकाराच्या नावाची भर पडली असून, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निमिष कुलकर्णी विवाहबंधनात अडकला आहे. आपल्या अभिनय आणि सहज विनोदाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या निमिषने आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. निमिष कुलकर्णीने कोमल भास्कर हिच्यासह लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाहसोहळ्याचे खास क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दोघेही अतिशय सुंदर आणि पारंपरिक लुकमध्ये दिसत आहेत.

आणखी वाचा : माधवी निमकरची छोट्या पडद्यावर एंट्री, शालिनीच्या तोडीस तोड भूमिका आणि…; म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

लग्नाच्या विशेष दिवशी निमिषने केशरी रंगाची धोतर आणि पांढरा कुर्ता परिधान केला होता, तर कोमलने केशरी रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसली होती. कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही निमिष आणि कोमल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर तीन महिन्यांतच सुप्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नातील साधेपणाने वेधलं लक्ष

Tags: marathi actormarathi entertainment newsNimish Kulkarni Wedding Look
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Rohini Hattangadi Big Decision

'ठरलं तर मग' मधून पुन्हा एकदा पूर्णा आजींची EXIT?, रोहिणी हट्टंगडींचा मोठा निर्णय प्रेक्षक नाराज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.