शनिवार, ऑगस्ट 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 22, 2026 | 3:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nikhil Chavan Wedding

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

Nikhil Chavan Wedding: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच अनुष्काचा मेहंदी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, निखिल चव्हाणनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर होणाऱ्या पत्नीचे म्हणजेच अनुष्काच्या मेहंदी सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. सध्या अनुष्का आणि निखिलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या २४ जूनला अनुष्का व निखिल शाही थाटामाटात लग्नबंधनात अडकणार आहेत.

याशिवाय त्याने एक मजेशीर स्टोरीही पोस्ट केली. लग्नासाठी तयार केलेल्या शूजचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, “या शूजचा अक्चुअल रेट २४ तारखेला ठरणार,” असे त्याने लिहिले आहे. त्याच्या या विनोदी पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय लग्नाबद्दलची त्याची उत्सुकताही दिसून आली. याचसोबत ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकरने निखिलची करवली बनत एक खास फोटो शेअर केला आहे. मालिकेत भाऊ-बहीण म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही जोडी आता निखिल आणि अनुष्काच्या लग्नातही एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! अनुष्का सरकटेच्या हातावर रंगली निखिलच्या नावाची मेहंदी, खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

‘लागीर झालं जी’ मालिकेत निखिल आणि शिवानी यांचं बहीण-भावाचं नातं चर्चेत राहील. मालिकेत दोघेही एकमेकांच्या पाठीशी नेहमीच उभे राहताना दिसले. यानंतर आता खऱ्या आयुष्यातही शिवानी आपल्या भावाची पाठराखीण म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. निखिलच्या लग्नासाठी शिवानी करवली म्हणून पोहोचली आहे. आणि ती बहीण म्हणून तिची जबाबदारी पेलवताना दिसत आहे. निखिल आणि अनुष्का ‘कारभारी लयभारी’ मालिकेमुळे एकत्र आले. थेट सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करत त्यांनी प्रेमाची कबुली दिली.

Tags: Anushka Sarkatemarathi celebrityNikhil Chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
Next Post
Ghabadkund Marathi Movie

‘घबाडकुंड' च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.