मंगळवार, जून 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 22, 2026 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sakav marathi web series

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली 'साकव' वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

Sakav marathi web series : कालच फादर्स डे होता आणि हो, या दिवशी प्रत्येकाने आपल्या वडिलांसाठी काही ना काही पोस्ट शेअर केली होती. यादरम्यान सोशल मीडियावर एक टिझरची झलक सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसली. बाप-मुलाचं नातं स्पष्टपणे मांडणारा हा व्हिडीओ पटकन मनाला चटका लावून गेला. कारण या व्हिडीओमधील संवाद. मालवणी, कोकणी भाषेत सुरु झालेले हे संवाद काळजाला भिडले आणि नेमकं साकव नाव असलेलं हे गणित काय आहे याची उत्सुकता लागली. ‘साकव’ म्हणजे पूल. रस्त्यांना, मनाला, जागेला, भाषेला जोडणारा हा पूल म्हणजेच साकव. मालवणी भाषेत या पूलाला साकव म्हणतात. पण या वेबसीरिजमधील हा ‘साकव’ एका बाप-लेकाच्या नात्याला जोडणारा असल्याने अधिक आकर्षण आहे.

‘इट्स मज्जा ओरिजनल’ आणि ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत ही ‘साकव’ वेबसीरिज आहे. ‘इट्स मज्जा ओरिजनल’ने आजवर ‘आठवी-अ’, ‘दहावी-अ’, ‘मैत्रीचा सातबारा’, ‘पाऊस’, ‘पाऊस २’ या अनेक आशयाच्या वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. आणि त्यांनी ‘अकरावी’ या वेबसीरिजची घोषणा केली यासाठीही प्रेक्षकवर्ग उत्सुक आहेत. आणि यांत भर घालत आता एका अनोख्या आणि अतिशय महत्त्वाच्या नात्यावर भाष्य करणारी ‘साकव’ ही वेबसीरिज त्यांनी आणली आहे. समोर आलेल्या टिझरमध्ये पाठमोरे दिसणारे कलाकार टीझरची उत्सुकता ताणत आहेत. तर कोकणातील नयनरम्य वातावरणात ही वेबसीरिज शूट झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! अनुष्का सरकटेच्या हातावर रंगली निखिलच्या नावाची मेहंदी, खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

निर्माते सौरिंद्र नाथ दत्ता यांची निर्मिती असलेली ही ‘साकव’ ही वेबसीरिज असून नितीन वाडेवाले यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर सीरिजचे लेखन नितीन पवार यांनी केले आहे. आणि प्रॉडक्शन व क्रिएटिव्ह हेड म्हणून अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे यांनी संभाळली आहे. कोकणात शूट झालेल्या या वेबसीरिजमध्ये कोणते कलाकार असणार हे गुलदस्त्यात असल्याने वेबसीरिज कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: its majjaMarathi web seriesSakav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sarkate And Nikhil Chava Dance
Entertainment

निखिल-अनुष्का हळदीत बेभान होऊन नाचले, मराठी कलाकारांचाही तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

जून 23, 2026 | 3:30 pm
Anushka Sarkate And Nikhil Chavan
Entertainment

हळद लागली! अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची जोरदार हळद, मंडपातच नवरा-नवरीचा भन्नाट डान्स अन्…

जून 23, 2026 | 2:50 pm
Anushka Sarkate engagement
Entertainment

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांचा साखरपुडा संपन्न; खास फोटोंनी जिंकली चाहत्यांची मनं

जून 23, 2026 | 10:11 am
Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Next Post
Nikhil Chavan Wedding

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.