स्वतःच, हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अथक प्रयत्नांनी प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत असतो. अनेक कलाकार मंडळींनीही हे स्वप्न पूर्ण केलं आहे. घर घेतल्याची आनंदाची बातमी शेअर करत ही कलाकार मंडळी त्यांच्या घराबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. ही कलाकार मंडळी त्यांच्या नव्या घरासाठी विशेष उत्सुक असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. (Hruta Durgule New Home)
छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’, ‘दुर्वा’ यांसारख्या मालिकांमधून हृता दुर्गुळे घराघरात पोहोचली. आपल्या लाघवी सौंदर्यानं व अभिनयानं हृतानं प्रत्येकाच्या मनात घर केलं. विशेषतः तरुणांच्या मनात हृताने तिचं स्थान निर्माण केलं. हजारो तरुणांचा हृदयभंग करून हृता दुर्गुळे हिनं प्रतिक शाहबरोबर लगीनगाठ बांधली. प्रतिक व हृताच्या लग्नसोहळ्याला दोघांच्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी उपस्थित होते.
ऋता व प्रतिक नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. हृताचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसह काही ना काही शेअर करून त्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऋता व प्रतिकने नवं घर घेतलं असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे. हृताचा नवरा प्रतिक शाह हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. प्रतिकनं आतापर्यंत अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.
ऋता व प्रतिकने त्यांच्या नव्या घरात छान अशी रोमँटिक पोज देतानाचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. हृताने या पोस्टमध्ये “आम्ही करून दाखवलं, नवीन घर, आमचं घर, खास दिवस असे हॅशटॅग वापरले आहेत. हृताच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी तसेच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षांव केला आहे.