मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विशाखा सुभेदारच्या नाटकातून अखेर नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकरची एक्झिट, त्यांच्याजागी झळकणार ‘हे’ दोन नवे चेहरे

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 3, 2023 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishakha Subhedar On Namrata Sambhrao And Prasad Khandekar

विशाखा सुभेदारच्या नाटकातून अखेर नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकरची एक्झिट, त्यांच्याजागी झळकणार 'हे' दोन नवे चेहरे

सध्या मराठी प्रेक्षकवर्ग हा रंगमंचाकडे वळलेला पाहायला मिळत आहे. मराठी नाटकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. अशातच एका मोठ्या नाटकाबाबत आश्चर्याचा धक्का देणारी बाब समोर आली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेत रंगभूमीकडे पावलं टाकली. विशाखा ही एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच एक निर्मातीदेखील आहे. (Vishakha Subhedar On Namrata Sambhrao And Prasad Khandekar)

सध्या रंगभूमीवर गाजत असलेले ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाची निर्मिती तिनेच केली आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळेसह विशाखाने अभिनय केला आहे. त्याचबरोबर तिने या नाटकाची निर्मितीदेखील केली आहे. या नाटकांत काही बदल करणार असल्याची एक पोस्ट काल विशाखा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. त्यामुळे या नाटकादरम्यान नेमका कोणता बदल होणार याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत विशाखाने झालेल्या बदलाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा – “आम्ही करून दाखवलं…”, ऋता दुर्गुळेने घेतलं नवं घर, नवऱ्यासह रोमँटिक पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट करत विशाखाने “कुर्रर्रर्रर्र’ नाटकातून प्रसाद खांडेकर आणि नम्रता आवटे संभेराव यांची एक्झिट. पहा कोणते दोन कलाकार प्रेक्षकांच्या कानात कुर्रर्रर्रर्र करण्यासाठी सज्ज आहेत? असं म्हणत पोस्ट शेअर करत दोन नवे चेहरेही दाखवले आहेत. कुर्रर्रर्रर्र या नाटकातून नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांची एक्झिट झाली असून याजागी अभिनेत्री मयुरा रानडे व अभिनेता प्रियदर्शन जाधव हे कलाकार दिसणार आहेत. विशाखाने हा आश्चर्याचा धक्का तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by रंगभूमी.com (@myrangabhoomi)

आणखी वाचा – चित्रपटात एकही संवाद नसून रणबीरवरही भारी पडला बॉबी देओल; कौतुक ऐकून रस्त्यात ढसाढसा रडू लागला अभिनेता

विशाखाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याआधी ही एक पोस्ट शेअर केली होती. नाटकाबद्दलची एक पोस्ट शेअर करत तिने आगामी काळात नाटकात होणाऱ्या बदलाविषयी संगितले आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कुर्रर्रर्रर्र हे माझं, प्रग्यास (निर्मिती संस्था)चं पहिलं नाटक आहे. ४ डिसेंबरला या नाटकाचा शुभारंभ होऊन आता दोन वर्ष पूर्ण होतील! कोव्हिडसारख्या काळात धडपड करुन हे नाटक उभं केलं. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पंढरीनाथ कांबळे यांचीही साथ होतीच. पण आता त्यात काही बदल घडत आहेत. काहीही झालं तरी जोवर नाटक जगत आहे, तोवर जगवायचं हे निर्मिती संस्थेचं काम आहे आणि ते काम मी इमाने इतबारे करत राहणार. पुन्हा एकदा नवीन मोट बांधत आहे. नाटकात काही बदल होणार आहेत आणि हे बदल काय हे तुम्हाला लवकरच सांगेन. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या.”

Tags: entertainmentkurrrr playkurrrrr marathi natakmarathi actressmarathi playnamrata sambheraoprasad khandekarvishakha subheadar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Ketaki Mategaonkar Answer To Trollers

"अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत…", बॉडी शेमिंगवरून भाष्य करणाऱ्या ट्रोलर्सला अखेर केतकी माटेगावंकरने सुनावलं, म्हणाली, "तुम्हाला सुद्धा घरात आई, बहिणी…."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.