मंगळवार, एप्रिल 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आतापर्यंत ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून काढता पाय, पण यामागचं नेमकं कारण काय?, प्रेक्षकही नाराज

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2024 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mhj Artist Leave The Show

आतापर्यंत 'या' सुप्रसिद्ध कलाकारांचा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून काढता पाय, पण यामागचं नेमकं कारण काय?, प्रेक्षकही नाराज

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर सिनेसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते आहेत. हा कार्यक्रम जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून या कार्यक्रमाने स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. प्रेक्षकांचाही या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात या कार्यक्रमाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदी अंगाने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. (Mhj Artist Leave The Show)

सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. या कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरेने कायमची एक्झिट घेतली असल्याचं समोर आलं आहे. गौरव हा हास्यजत्रेच्या प्रेक्षकांचा लाडका होता. गौरवने या कार्यक्रमातून बाहेर पडला असल्याची बातमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसह दिली. गौरवच्या जाण्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “ओंकार भोजनेसारखा चुकीच्या शोमध्ये जाऊन…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर गौरव मोरेला नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेता म्हणाला, “प्रत्येक गोष्टीला…”

गौरवच्या आधीही हास्यजत्रेतील अनेक कलाकार मंडळींनी या शोचा निरोप घेतला आहे. या कलाकारांच्या यादीत विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे (पॅडी), भूषण कडू, ओंकार भोजने आणि आता गौरव मोरे अशा या हास्यजत्रेतील लोकप्रिय व टॉपच्या कलाकारांनी शोला रामराम केला. एकामागोमाग एक कलाकार मंडळी हास्यजत्रेतून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांमध्येही नाराजीचा सूर वेळोवेळी पाहायला मिळाला. असं असलं तरी या कलाकारांना त्यांचे चाहते नेहमीच मिस करताना दिसतात. विशाखा सुभेदार यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागे कारण म्हटलं तर काहीतरी नवीन करायचं होतं, इतकंच आहे”. तर ओंकार भोजनेने ही अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं की, “त्याला वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून तो चित्रपटांकडे वळला”. तर गौरवनेही नवा प्रवास सुरु केल्याने हास्यजत्रा सोडली.

आणखी वाचा – गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली?, अभिनेत्याने कारण सांगताच समीर चौघुले, प्रसाद खांडेकर म्हणाले, “भावा तुला…”

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची मोठी संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे कलाकारांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक नवोदित कलाकारांना या विनोदी अंगाच्या प्लॅटफॉर्मने खूप मोठी संधी दिली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या कलाकारांना एका मुठीत बांधून ठेवण्याचे काम या कार्यक्रमाचे खरे बादशाह लेखक-दिग्दर्शक यांनी केले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyajatraMarathi Comedy ShowmhjMhj Artist Leave The Show
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Marathi actor Kiran Mane shared video of a woman criticizing Prime Minister Narendra Modi.

"राम मंदिर बांधलं म्हणून मोदी राम होणार नाहीत", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला महिलेचा 'तो' व्हिडीओ, म्हणाली, "इज्जत लुटली..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.