शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटात एकही संवाद नसून रणबीरवरही भारी पडला बॉबी देओल; कौतुक ऐकून रस्त्यात ढसाढसा रडू लागला अभिनेता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 3, 2023 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bobby Deol Video

चित्रपटात एकही संवाद नसून रणबीरवरही भारी पडला बॉबी देओल; कौतुक ऐकून रस्त्यात ढसाढसा रडू लागला अभिनेता

सध्या चित्रपटगृहांमध्ये चर्चा सुरु आहे ती लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला सध्या जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चुरशीची लढाई सुरु झाली होती. तुडुंब भरलेली चित्रपटगृहे, बाहेर लांबच्या लांब रंगलेल्या रांगा ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेचं आणि त्याच्या पात्राचं प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद ही लाभतांना पाहायला मिळत आहे. (Bobby Deol Video)

अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेचं खास कौतुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील आणखी एका कलाकाराचं नाव प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. तो म्हणजे अभिनेता बॉबी देओल. बॉबी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावरही प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे तसेच त्याच्या पात्राचे कौतुक करताना थकत नाही आहेत. त्यामुळे होणारा प्रेमाचा वर्षाव पाहता अभिनेत्याला अश्रू अनावर झाले आहेत.

आणखी वाचा – “आधीची स्टेज…”, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी देतेय कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढा, पोस्ट लिहीत म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा…”

‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात बॉबीने मुक्याची भूमिका साकारली आहे. त्याच्या या पात्राला एकही संवाद नाही आहे. अशातच केवळ अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. बॉबीला चित्रपटात फार कमी टाइम स्क्रीन शेअर मिळाली आहे असं असलं तरी त्याची भूमिका भाव खाऊन जात आहे. अभिनेत्यावर होणार कौतुक पाहता बॉबीलादेखील अश्रू अनावर झाले आणि तो रस्त्यातच रडू लागला. त्याचा एक व्हिडिओ विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटनवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो सगळ्यांचे आभार मानताना व रडताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – “पारंपरिक लूक, लक्षवेधी पोशाख अन्….”, ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री राधा सागरच्या लेकाचं थाटामाटात साजरं झालं बारसं, चिमुकल्याच्या नावानं वेधलं लक्ष

या व्हिडिओमध्ये बॉबी देओल हात जोडून कॅमेरासमोर बोलतो की, “खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. एवढं प्रेम मिळतंय चित्रपटाला. माझ्या भूमिकेला. खूप धन्यवाद. असं वाटतंय मी स्वप्न बघतोय”. बॉबीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक व कमेंटचा वर्षाव केला आहे.

Tags: animalanimal moviebobby deolbobby deol emotionalBobby Deol Videobollywod actorentertainmentranbeer kapoor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Hruta Durgule New Home

"आम्ही करून दाखवलं…", ऋता दुर्गुळेने घेतलं नवं घर, नवऱ्यासह रोमँटिक पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.