‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेमधून राधाची भूमिका केलेली वीणा जगतापला देखील खूप प्रसिद्धी मिळाली. पण काही महिन्यातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर वीणा ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामध्येही दिसून आली. या कार्यक्रमामुळे तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या शोमध्ये तिचे शिव ठाकरेबरोबर प्रेमबंध जुळले. दोघेही अनेक ठिकाणी एकत्रित दिसून आले. मात्र काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. तेव्हा वीणा खूप दिवस मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली दिसून आली. (veena jagtap in rama raghav serial)
‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘बिग बॉस’ नंतर ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर झालेली पाहायला मिळाली. पण आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर दिसून येणार आहे. वीणा आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ या मालिकेमध्ये एका वेगळ्या रुपात दिसून येणार आहे. विणाच्या मालिकेत येण्याने मालिकेमध्ये कोणते नवीन वादळ येणार हे आता पाहाण्यासारखे आहे.
रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश झाला आहे.
याआधी मालिकेमध्ये अद्वैत दादरकरची देखील एंट्री झाली आहे. यामध्ये तो नकारात्मक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर वीणाची एंट्री झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. वीणाच्या येण्याने मालिकेमध्ये कोणते रंजक वळण येणार? हे आता पाहण्यासारखे आहे. वीणाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘बिग बॉस’ का कार्यक्रमामध्ये दिसली होती. यामध्ये तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे आता ‘रमा राघव’ मालिकेमधील वीणा प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडत आहे हे पाहण्यासारखे आहे.