शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पारंपरिक लूक, लक्षवेधी पोशाख अन्….”, ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री राधा सागरच्या लेकाचं थाटामाटात साजरं झालं बारसं, चिमुकल्याच्या नावानं वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 3, 2023 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Radha Sagar Son Name Ceremony

"पारंपरिक लूक, लक्षवेधी पोशाख अन्….", 'आई कुठे…' फेम अभिनेत्री राधा सागरच्या लेकाचं थाटामाटात साजरं झालं बारसं, चिमुकल्याच्या नावानं वेधलं लक्ष

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री राधा सागरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काही महिन्यापूर्वी राधाने खास गरोदरपणातील फोटोशूट करत चाहत्यांना आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यावर चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर अखेर तिची प्रतीक्षा संपली आणि तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. तिने याबाबतची पोस्ट शेअर करत चिमुकल्याचा हात दाखवत फोटो शेअर केला होता. (Radha Sagar Son Name Ceremony)

राधाने ‘आई कुठे काय करते’ सोबतच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये अभिनय करत चाहत्यांच्या मनात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं होतं. गरोदरपणामुळे तिने अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता तिच्या घरी चिमुकला पाहुणा आला आहे. नुकतंच राधाच्या बाळाचं बारस थाटामाटात पार पडलं. याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावरून शेअर देखील केले आहेत. राधाने शेअर केलेल्या या फोटो, व्हिडिओमध्ये तिच्या बाळाची झलक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लेकीने टाकलं पहिलं पाऊल, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नवऱ्याचंही केलं कौतुक, म्हणाली, “आमच्या मुलीला…”

राधाने अगदी शाही थाटामाटात तिच्या बाळाचा बारसं पार पाडलं. पारंपरिक लूक करून अभिनेत्रींच्या कुटुंबीयांनी या सोहळ्याची खास रंगत वाढविली. राधा व तिच्या पतीने तसेच त्यांच्या बाळानेही सारखेच कपडे परिधान केले होते. राधाने तिच्या बाळाचं नाव वीर असं ठेवलं आहे. वीरच्या बारश्यानिमित्त तिने छान अशा केक ही बनवून घेतलेला पाहायला मिळाला. लेकाच्या नामकरण सोहळ्यासाठी अभिनेत्रीने केलेला खास लूक पाहणं रंजक ठरलं.

View this post on Instagram

A post shared by Disha Kumbhar (@disha_k_makeover15)

आणखी वाचा – “त्यांना चालताही येत नव्हतं अन्…”, वडील रमेश देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत अजिंक्य देव यांचा खुलासा, म्हणाले, “तरीही शूटला गेले आणि…”

राधा सागरने या सोहळ्यसाठी पैठणीचा हटके असा वनपीस परिधान केला होता. तसेच त्यावर घातलेल्या साजेश्या ज्वेलरीमुळे तिचं सौंदर्य अधिकचं खुलून आलं होतं. तसेच राधाच्या लेकाची म्हणजेच वीरची पहिली झलकही तिने शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओवरून पाहायला मिळाली. राधाने अगदी गोंडस बाळाला जन्म दिला. लेकाच्या बारश्यातील वीरचा पारंपरिक लुकही लक्षवेधी ठरत होता.

Tags: aai kuthe kay karteentertainmentmarathi actressmarathi malikamarathi serialradha sagarradha sagar son name ceremony
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
CID fame Dinesh Phadnis Heart Attack

CID फेम फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांची प्रकृती चिंताजनक, हृदयविकाराचा झटका आल्याने व्हेंटिलेटरवर देत आहेत मृत्यूशी झुंज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.