हिंदी चित्रपटसृष्टी ही संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटांचा बोलबाला भारतातच नाही संपूर्ण जगभरात असलेला पाहायला मिळतो. ९० च्या दशकामध्ये अभिनेता शाहरुख खान, आमिर खान व सलमान खान यांनी अनेक हीट चित्रपट देऊन हिंदी चित्रपटसृष्टी ही अधिक नावारूपाला आली आहे. या अभिनेत्यांचे संपूर्ण जगभरामध्ये चाहते आहेत. पण अशातच आता पाकिस्तान अभिनेत्रीने खान मंडळींवर ताशेरे ओढले आहेत. या अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. ती नक्की काय बोलली आणि त्याचा परिणाम काय झाला ते जाणून घेऊया. (nadia khan on bollywood actors)
पाकिस्तानी अभिनेत्री व सूत्रसंचालक नादिया खानने एका कार्यक्रमावेळी असे काही बोलून गेली जे प्रेक्षकांच्या अजिबात पचनी पडली नाही. ती बॉलिवूड अभिनेत्री व अभिनेत्यांना असुरक्षित असल्याचे म्हणाली आहे. तसेच ती म्हणाली की बॉलिवूड कलाकार पाकिस्तानी कलाकारांना घाबरतात. त्यांच्या टॅलेंटचा सामना ते करु शकत नाहीत अशा आशयाचे विधान तिने केले आहे.
I need her delusion pic.twitter.com/TVDBuP754j
— Ash (@ashilikeit) April 3, 2024
नादिया पाकिस्तानी शो ‘क्या ड्रामा है’मध्ये सामील झाली होती. त्यावेळी ती हे बोलली असून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नादिया म्हणाली की, “हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर फवाद खान व इतर पाकिस्तानी कलाकारांना संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना असुरक्षित झाले. त्यामुळे त्या लोकांनी राजकीय पाठिंबा घेऊन पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. तेथील केवळ राजकारणी आमच्यासाठी समस्या नाही तर तेथील दिग्गज कलाकारदेखील आम्हाला घाबरतात. त्यांना केवळ पाकिस्तानी कलाकारांना चित्रपट मिळतील म्हणून नाही तर भारतातील लोकदेखील पाकिस्तानी कलाकारांना खूप पसंत करत आहेत. ते इतके घाबरले की त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच घातली”.
पुढे ती म्हणाली की, “जे काम आमच्याकडील अभिनेते डोळ्यांनी अभिनय करतात ते बॉलिवूडमधील कलाकार करु शकत नाहीत. नुकतेच आमचे कलाकार वहाज व बिलाल यांनी जे काम केले आहे त्यामुळे भारतीय लोक त्यांच्या प्रेमात पडले आहेत. भारतामध्ये आमच्या दोन्ही कलाकरांची चाहत्यांची संख्या वाढली आहे. एवढच काय तर खान मंडळी असुरक्षित झाले असून त्यांना भीती आहे की पाकिस्तानी कलाकार आमच्यामध्ये आले तर आम्ही काय करायचं ? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
नादियाच्या या विधानावर सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केले जात आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती.