शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नाडी सुटली, पायजमा खाली आला अन्…”, अविनाश नारकरांनी ‘त्या’ कलाकाराची केली पोलखोल, म्हणाले, “नाटक सुरु असतानाच…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 5, 2024 | 3:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actor avinash narkar on play

"नाडी सुटली, पायजमा खाली आला अन्…", अविनाश नारकरांनी 'त्या' कलाकाराची केली पोलखोल, म्हणाले, "नाटक सुरु असतानाच…"

मराठी चित्रपटसृष्टीमधील अविनाश नारकर हे लोकप्रिय अभिनेते आहेत. १९९४ साली ‘मुक्ता’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून काम केले. त्यांच्या सर्व भूमिका प्रचंड गाजल्या. चित्रपटांबरोबर त्यांनी अनेक नाटके व मालिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकताच त्यांनी ‘झी नाट्यगौरव २०२४’ या सोहळ्यादरम्यान त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या नाटकाबद्दलच्या आठवणी प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या आहेत. त्यांनी एका नाटकामध्ये घडलेला प्रसंग सांगितला आहे. यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. (actor avinash narkar on play )

अविनाश यांनी चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. अशाच एका नाटकादरम्यानचा किस्सा सांगितला आहे. हा व्हिडीओ ‘झी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा किस्सा सांगताना ते म्हणाले की, “हा रणांगण नाटकातील एक मजेशीर किस्सा आहे जो मि आयुष्यात कधीही विसरणार नाही. शिवाजीमंदिर येथे या प्रयोग सुरु होता. त्यामध्ये एक सीन असा होता ज्यामध्ये भाऊसाहेब पेशवा उत्तर मोहिमेचा विडा उचलतात. तिथे रघुनाथराव लेखणी मोडतात आणि म्हणतात की हा विडा मी उचलणार असं म्हणून मी मंचावर फिरायचो व स्टेजच्यामध्ये येऊन समोर सिंहासनावर बसलेल्या नानासाहेब पेशव्यांकडे हात वर उचलून विडा उचलून जाहीर करायचो.त्यानंतर नानासाहेब सिंहासनावरुन उठून तलवार घेऊन माझ्याकडे यायचे आणि माझ्या हातात तलवार द्यायचे आणि मला मोहीम फत्ते करुन येण्यास सांगायचे”.

आणखी वाचा – “नाटक सुरु असताना समोर पडलेला आंबा उचलला अन्…”, वंदना गुप्तेंची दिग्दर्शकांनी केली खरडपट्टी, म्हणाल्या, “ते ओरडत होते तोपर्यंत…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुढे ते म्हणाले की, “चालत जात असताना गोपिकाबाई थांबवायच्या. हा प्रयोग असाच सुरु असताना नानासाहेब अचानक माझ्या दिशेने पटापट चालत आले आणि मला गच्च धरुन माझ्या हातात तलवार दिली. पण त्यांनी मला फिरवले नाही आणि मी जायच्या ऐवजी ते स्वतःच चालत गेले. मी सीन पूर्ण करुन त्यांच्या मागे विंगेत गेलो. त्यांना विचारले की नक्की काय झाले. ते उठले आणि नानासाहेबांनी माझे पाय धरले आणि म्हणाले मी काय सांगू आणि म्हणाले की मी नंतर उठताच माझ्या पायजम्याची नाडी तुटली आणि पायजमा खाली आला. पण नानासाहेब पेशव्यांचा अंगरखा घोळदार असल्याने ते जास्त कोणाला दिसले नाही आणि झटकन ते आतमध्ये निघून गेले”.  

आणखी वाचा – गोविंदाची भाची आरती सिंह ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात?, लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमकं काय करतो?

अशाप्रकारे अनेक मजेशीर किस्से नाटकात होत असतात असे त्यांनी सांगितले. अविनाश यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ते नुकतेच ते ‘कन्यादान’ या मालिकेमध्ये दिसून आले होते. तसेच ते सोशल मीडियावर देखील जास्त प्रमाणात सक्रिय असतात.

Tags: avinash narkardramamarathi actorplay
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Siddharth Chandekar was injured in the head during a play see the details

डोक्याला जखम, रक्त वाहत होतं अन्...; कशाचीच पर्वा न करता सिद्धार्थ चांदेकरने पूर्ण केलं नाटक, बेशुद्ध पडेल अशी अवस्था होती पण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.