चाहत्यांना कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. कलाकार मंडळींच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे, ते कोणाला डेट करत आहेत, तसेच त्यांच्या लग्नाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. बरेचदा कलाकार मंडळी स्वतःहून चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबाबत सांगत असतात. मात्र काही कलाकार असे असतात ज्यांना त्यांचं खासगी आयुष्याबाबत खुलासे करायला आवडतं नाहीत. दरम्यान, बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री पूजा भट्टच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. (Pooja Bhatt On Marriage)
बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी ‘बिग बॉस’ ओटीटी स्पर्धक पूजा भट्ट आज ५२ वर्षांची झाली असली तरी तिचे चाहते तिच्या लग्नाबद्दल जाणून घ्यायला खूप उत्सुक आहेत. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सपेक्षा पूजाचे चाहते तिच्या लग्नाशी संबंधित प्रश्न विचारतात आणि ती कधी लग्न करणार आहे, असे अनेक प्रश्न विचारतात. अशातच आता पूजाने चाहत्यांच्या प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. स्वत: पूजाने तिच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा भट्टने नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. अभिनेत्रीने सांगितले की, आजही लोक तिला एकच प्रश्न विचारतात की ‘ती एकटी का आहे’, ‘तिने लग्न का केले नाही?'”. अभिनेत्री म्हणाली की, “लोक नेहमी माझ्या लग्नाची काळजी करतात आणि प्रत्येक वेळी नवीन व्यक्तीशी ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतात, पण मी लग्न का करू?, मला आता लग्नाची गरज नाही. मी अविवाहितच चांगली आहे. त्याच बरोबर जर नशिबात कोणाला भेटणे लिहिले असेल तर ती व्यक्ती नक्कीच भेटेल”, असंही ती म्हणाली.
पूजा भट्ट नुकतीच ‘बॉम्बे बेगम्स’मध्ये दिसली होती. या चित्रपटात पूजाने दमदार भूमिका साकारली होती. पूजाने तिच्या करिअरमध्ये अनेक दमदार चित्रपट केले आहेत. आज भले ती चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती अनेकदा आपले मत निर्भीडपणे मांडताना दिसते.