मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खान मंडळी आम्हाला घाबरतात म्हणून…”, पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली, “आम्हाला बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी घातली कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 5, 2024 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
nadia khan on bollywood actors

"खान मंडळी आम्हाला घाबरतात म्हणून...", पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली, "आम्हाला बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी घातली कारण..."

हिंदी चित्रपटसृष्टी ही संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. हिंदी चित्रपटांचा बोलबाला भारतातच नाही संपूर्ण जगभरात असलेला पाहायला मिळतो. ९० च्या दशकामध्ये अभिनेता शाहरुख खान, आमिर खान व सलमान खान यांनी अनेक हीट चित्रपट देऊन हिंदी चित्रपटसृष्टी ही अधिक नावारूपाला आली आहे. या अभिनेत्यांचे संपूर्ण जगभरामध्ये चाहते आहेत. पण अशातच आता पाकिस्तान अभिनेत्रीने खान मंडळींवर ताशेरे ओढले आहेत. या अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. ती नक्की काय बोलली आणि त्याचा  परिणाम काय झाला ते जाणून घेऊया. (nadia khan on bollywood actors)

पाकिस्तानी अभिनेत्री व सूत्रसंचालक नादिया खानने एका कार्यक्रमावेळी असे काही बोलून गेली जे प्रेक्षकांच्या अजिबात पचनी पडली नाही. ती बॉलिवूड अभिनेत्री व अभिनेत्यांना असुरक्षित असल्याचे म्हणाली आहे. तसेच ती म्हणाली की बॉलिवूड कलाकार पाकिस्तानी कलाकारांना घाबरतात. त्यांच्या टॅलेंटचा सामना ते करु शकत नाहीत अशा आशयाचे विधान तिने केले आहे.

आणखी वाचा – दारुचं व्यसन, वडिलांबरोबरच किस आता ५२व्या वर्षी लग्न करणार आलिया भट्टची बहीण, म्हणाली, “जर नशिबात…”

I need her delusion pic.twitter.com/TVDBuP754j

— Ash (@ashilikeit) April 3, 2024

नादिया पाकिस्तानी शो ‘क्या ड्रामा है’मध्ये सामील झाली होती. त्यावेळी ती हे बोलली असून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नादिया म्हणाली की, “हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर फवाद खान व इतर पाकिस्तानी कलाकारांना संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना असुरक्षित झाले. त्यामुळे त्या लोकांनी राजकीय पाठिंबा घेऊन पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. तेथील केवळ राजकारणी आमच्यासाठी समस्या नाही तर तेथील दिग्गज कलाकारदेखील आम्हाला घाबरतात. त्यांना केवळ पाकिस्तानी कलाकारांना चित्रपट मिळतील म्हणून नाही तर भारतातील लोकदेखील पाकिस्तानी कलाकारांना खूप पसंत करत आहेत. ते इतके घाबरले की त्यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच घातली”.

आणखी वाचा – “नाडी सुटली, पायजमा खाली आला अन्…”, अविनाश नारकरांनी ‘त्या’ कलाकाराची केली पोलखोल, म्हणाले, “नाटक सुरु असतानाच…”

पुढे ती म्हणाली की, “जे काम आमच्याकडील अभिनेते डोळ्यांनी अभिनय करतात ते बॉलिवूडमधील कलाकार करु शकत नाहीत. नुकतेच आमचे कलाकार वहाज व बिलाल यांनी जे काम केले आहे त्यामुळे भारतीय लोक त्यांच्या प्रेमात पडले आहेत. भारतामध्ये आमच्या दोन्ही कलाकरांची चाहत्यांची संख्या वाढली आहे. एवढच काय तर खान मंडळी असुरक्षित झाले असून त्यांना भीती आहे की पाकिस्तानी कलाकार आमच्यामध्ये आले तर आम्ही काय करायचं ? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

नादियाच्या या विधानावर सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केले जात आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती.

Tags: aamir khanbollywood actorsnadia khanPakistani Actresssalman khanshahrukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Prathamesh Laghate wished Mugdha Vaishampayan on her birthday.

स्कर्ट, टॉप अन्…; साडी, नथ नव्हे तर प्रथमेश लघाटेने बायकोचे वेस्टर्न लूकमधील फोटो केले शेअर, मुग्धाच्या लूकची सोशल मीडियावरही चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.