शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : अहिल्यादेवी व आबासाहेबांचं नातं आदित्यसमोर येणार का?, जवळच्या व्यक्तींचा एकमेकांना भासही झाला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 7, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

दिशा-प्रीतमच्या लग्नाची तारीख अहिल्यादेवी करणार जाहीर, आदित्यच्या टेन्शनमध्ये वाढ

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रियाचा भाऊ प्रीतमला कुस्ती शिकवत असतो त्या वेळेला तो प्रीतमची शाळा घेतो आणि प्रीतमला बेदम मारतो. तेव्हा आदित्य व पारू हे सगळं काही बघतात. पारू धावत आबासाहेब व प्रिया मॅडमना बोलावून हे सगळं काही सांगते. अबसाहेबांच्या शब्दावर प्रियाचा भाऊ प्रीतमला सोडून देतो मात्र प्रीतम मलाच कुस्ती शिकायची होती असं सांगत हा विषय सांभाळून घेतो. त्यानंतर सगळेच घरी आल्यावर आदित्य प्रीतमवर भरपूर रागावतो आणि सांगतो की, माझ्यासमोर तुला कोणी मारलेल मला चालणार नाही. यावर आदित्यची प्रीतम समजूत काढतो आणि सांगतो की, हा सुद्धा आपल्या प्रोसेस मधील भाग आहे.  (Paaru Serial Update)

त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस. त्यानंतर आदित्य सांगतो की, तुझं व प्रियाचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे म्हणून मी हे सगळं काही सहन करतोय. त्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला जातात आदित्य सुद्धा शेतात कामाला जातो शेतात काम करुन झाल्यावर आबासाहेब त्याला घ्यायला येतात तेव्हा आदित्य सांगतो की, थोडं काम बाकी आहे ते करुन मी आलोच. मात्र आबासाहेब सांगतात की पार्वती तू आल्याशिवाय जेवत सुद्धा नाही चल तू आता माझ्याबरोबर घरी, असं म्हणत गाडीत बसतात. तर इकडे आदित्यला अहिल्या देवींचा फोन येतो. अहिल्यादेवींचा फोन आल्यावर ते दोघेही एकमेकांशी काळजी पोटी बोलत असतात.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर रितेश निक्कीवर भडकला, मोठी शिक्षा देत म्हणाला, “इथून पुढे…”

अहिल्यादेवी आदित्य गणेशोत्सवात नसणार म्हणून दुःख व्यक्त करतात. तर उद्या एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे त्यामुळे मी उद्या दिशा आणि प्रीतमच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याचेही त्या सांगतात. तितक्यातच आबासाहेब आदित्यला आवाज देतात. आदित्यनाथ चला आधी पार्वती तुमची वाट बघत असेल, असं म्हणतात. अहिल्या देवी धक्क्याने उठतात आणि विचारतात हा आवाज कोणाचा आहे?, हा आवाज फार ओळखीचा वाटला?, जवळच्या व्यक्तीचा वाटला, हे ऐकल्यावर आदित्यही शॉक होतो. आदित्य सांगतो की तू अशी का अचानक बोललीस. त्यानंतर आदित्यला अहिल्यादेवी त्या आवाजाबद्दल विचारतात तेव्हा आदित्य खोटं कारण देत त्या कॉन्ट्रॅक्टरचा आवाज असल्याचं सांगतो.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी तिला बघायचो, ती शायनिंग मारत…”, सूरज चव्हाणने सांगितली त्याची लव्हस्टोरी, म्हणाला, “आमचं वाईला शूट असताना…”

घरी आल्यावर आबासाहेब पारूला सांगतात चल आपण जेवून घेऊया. तू सुद्धा आमच्याबरोबरच जेव मात्र पारू जेवायला तयार होत नाही ती सांगते माझे धनी जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. तेव्हा आबासाहेब आदित्यला बोलावून घेतात आणि आदित्यला एकत्र जेवणाबद्दल सांगितल्यावर आदित्य सांगतो की, माझा धाकटा भाऊ अजून जेवलेला नाहीये त्यामुळे मी सुद्धा जेवणार नाही. त्यांच्या तिघांचं हे प्रेम पाहून आबासाहेब खूपच भारावून जातात. आता मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवी व आबासाहेबांचे नातं कसं एकत्र येणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Nikki Tamboli insulting statement about Aarya Jadhav father netizens got angry

Bigg Boss Marathi : निक्कीने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, आर्याचा काढला बाप, प्रेक्षकांनी संस्करांवर निर्माण केलं प्रश्नचिन्ह

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.