Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्वभावाने आणि खेळीने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलं आहे. गोलीगत धोका फेम टिक टॉक आणि रिल स्टार सूरज चव्हाण यंदा ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सामील झाला असून त्याला महाराष्ट्रातील जनतेचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणचा खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सूरजला संबंध पाठिंबा देताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात त्याचे सर्वांबरोबरचे नातं अगदी खास आहे. अशातच सूरजने त्याच्या एका फिल्मी लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Lovestory)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज, पॅडी, अंकिता, अभिजीत व आर्या एकत्र बसलेले असतात. तेव्हा सूरज त्याच्या लव्हस्टोरीबद्दल असं म्हणाला की, “माझा एक चित्रपट सुरु होता. त्यातली एक मुलगी मला आवडायची. आमचं वाईला शूटिंग सुरु होतं. तेव्हा मला जी मुलगी आवडायची तिच्या खोलीबाहेर मी सतत येऊन बघायचो. ती पण शायनिंग मारायची. मी फक्त बघायचो. तर मी त्या मुलीला म्हटलं की मला तू खूप आवडते. चित्रपटात माझा एक तिच्याबरोबर सीन होता आणि तेव्हा मी तिला हा डायलॉग बोललो होतो. मी तिला तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस असं बोललो होतो. पण ती मला बोललो की तिला दूसरा मुलगा आवडतो. मग माझ्या दिलाचे चूरचूर तुकडे झाले”.
सूरज त्याची ही खास लवहस्टोरी सांगत असताना अंकिता, आर्या, अभिजीत व पॅडी त्याच्या या लव्हस्टोरीचा खास आनंद घेत असतात. त्याच्याबरोबर मजामस्ती करत असतात. पॅडी, अभिजीत व अंकिता त्यांना वेळोवेळी टास्कबद्दल आणि खेळाबद्दल समजावत असतात. अशातच कालच्या भागात सूरजने एकटा खेळणार असल्याचे म्हटलं. त्याला या घरात टिकून राहण्यासाठी स्वत:चा वैयक्तिक गेम खेळायचे असल्याचे पॅडीला म्हटले. त्यानंतर त्याने स्वत:चा गेम खेळत या घरातील कॅप्टन्सीचा बहुमान मिळवला आहे.
दरम्यान, कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने ‘झापुक झुपूक’ गेम करत बाजी मारली आणि तो आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे. सूरजच्या या कॅप्टन्सीचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यामुळे घरातील सदस्य “हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज भाऊ जैसा हो”, अशा घोषणा दिल्या आहेत.