‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रियाचा भाऊ प्रीतमला कुस्ती शिकवत असतो त्या वेळेला तो प्रीतमची शाळा घेतो आणि प्रीतमला बेदम मारतो. तेव्हा आदित्य व पारू हे सगळं काही बघतात. पारू धावत आबासाहेब व प्रिया मॅडमना बोलावून हे सगळं काही सांगते. अबसाहेबांच्या शब्दावर प्रियाचा भाऊ प्रीतमला सोडून देतो मात्र प्रीतम मलाच कुस्ती शिकायची होती असं सांगत हा विषय सांभाळून घेतो. त्यानंतर सगळेच घरी आल्यावर आदित्य प्रीतमवर भरपूर रागावतो आणि सांगतो की, माझ्यासमोर तुला कोणी मारलेल मला चालणार नाही. यावर आदित्यची प्रीतम समजूत काढतो आणि सांगतो की, हा सुद्धा आपल्या प्रोसेस मधील भाग आहे. (Paaru Serial Update)
त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस. त्यानंतर आदित्य सांगतो की, तुझं व प्रियाचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे म्हणून मी हे सगळं काही सहन करतोय. त्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला जातात आदित्य सुद्धा शेतात कामाला जातो शेतात काम करुन झाल्यावर आबासाहेब त्याला घ्यायला येतात तेव्हा आदित्य सांगतो की, थोडं काम बाकी आहे ते करुन मी आलोच. मात्र आबासाहेब सांगतात की पार्वती तू आल्याशिवाय जेवत सुद्धा नाही चल तू आता माझ्याबरोबर घरी, असं म्हणत गाडीत बसतात. तर इकडे आदित्यला अहिल्या देवींचा फोन येतो. अहिल्यादेवींचा फोन आल्यावर ते दोघेही एकमेकांशी काळजी पोटी बोलत असतात.
अहिल्यादेवी आदित्य गणेशोत्सवात नसणार म्हणून दुःख व्यक्त करतात. तर उद्या एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे त्यामुळे मी उद्या दिशा आणि प्रीतमच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याचेही त्या सांगतात. तितक्यातच आबासाहेब आदित्यला आवाज देतात. आदित्यनाथ चला आधी पार्वती तुमची वाट बघत असेल, असं म्हणतात. अहिल्या देवी धक्क्याने उठतात आणि विचारतात हा आवाज कोणाचा आहे?, हा आवाज फार ओळखीचा वाटला?, जवळच्या व्यक्तीचा वाटला, हे ऐकल्यावर आदित्यही शॉक होतो. आदित्य सांगतो की तू अशी का अचानक बोललीस. त्यानंतर आदित्यला अहिल्यादेवी त्या आवाजाबद्दल विचारतात तेव्हा आदित्य खोटं कारण देत त्या कॉन्ट्रॅक्टरचा आवाज असल्याचं सांगतो.
घरी आल्यावर आबासाहेब पारूला सांगतात चल आपण जेवून घेऊया. तू सुद्धा आमच्याबरोबरच जेव मात्र पारू जेवायला तयार होत नाही ती सांगते माझे धनी जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. तेव्हा आबासाहेब आदित्यला बोलावून घेतात आणि आदित्यला एकत्र जेवणाबद्दल सांगितल्यावर आदित्य सांगतो की, माझा धाकटा भाऊ अजून जेवलेला नाहीये त्यामुळे मी सुद्धा जेवणार नाही. त्यांच्या तिघांचं हे प्रेम पाहून आबासाहेब खूपच भारावून जातात. आता मालिकेच्या पुढील भागात अहिल्यादेवी व आबासाहेबांचे नातं कसं एकत्र येणार हे पाहणं रंजक ठरेल.