‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्य हरीशला शोधायला निघालेला असतो. आदित्यला हरीशच्या घरचा पत्ता सापडलेला असतो याबाबत तो त्याच्या आईला माहिती देतो. अहिल्यादेवींना फोन करुन तो सांगतो तितक्यातच त्याला हरीश बाजूने जाताना दिसतो त्याच वेळेला तो अहिल्यादेवींना सांगून फोन घाई घाईत ठेवतो. तेव्हा अहिल्या देवींना काळजी वाटू लागते. अहिल्यादेवी श्रीकांतजवळ काळजी व्यक्त करत म्हणतात की, आदित्यने असा घाईघाईत फोन का ठेवला असेल?, तो काही संकटात तर नसेल ना?, असं म्हणत त्या काळजी करत असतात. (Paaru Serial Update)
तर इकडे प्रीतमला आदित्यने प्रेझेंटेशन द्यायला सांगितलेलं असतं त्यावेळेला दिशाही ऑफिसमध्ये येते आणि सांगते की, त्या क्लाइंटला तुला समजवायला जमणार आहे का?, तू ही कंपनी डुबवशील असं म्हणत त्याचा आत्मविश्वास घालवते. तेव्हा प्रिया हे प्रेझेंटेशन प्रीतम सरच करतील असं सांगते. तेव्हा दिशा तिच्यावर रागावते आणि सांगते की, हा आमचा नवरा बायकोचा आणि फॅमिली मॅटर आहे त्यात कर्मचाऱ्यांनी पडू नये. त्याच वेळेला प्रिया आर्ग्युमेंट करायला जाते तेव्हा दिशा अहिल्या देवींना डायरेक्ट फोन करते आणि सांगते की, आता कामगारच आम्हाला शिकवायला लागले आहेत. आजचं प्रेझेंटेशन आदित्य नाही तर कोण करणार?, यावर अहिल्यादेवी दिशाला प्रेझेंटेशन करायला होकार देतात मात्र त्याच वेळेला दिशा प्रियाचं नाव सांगत सांगते की, पण प्रिया सांगत आहे की, हे प्रेझेंटेशन आदित्यने प्रीतमला करायला सांगितलं आहे त्यामुळे हे लोक मला इथे अडवून दाखवत आहेत.
आणखी वाचा – नेत्राच्या पोटातून अद्वैतला ऐकू आली विचित्र वीणा व किंचाळी, नेत्रा व बाळ वाचणार का?
हे ऐकल्यावर अहिल्यादेवींच्या लक्षात येते की, हे प्रीतमला करायला सांगितलेलं प्रेझेंटेशन आहे म्हणजे त्यामागे नेमकं काहीतरी कारण असणार तेव्हा हे प्रेझेंटेशन प्रीतमलाच करु दे पुढे त्यालाही कंपनी सांभाळायची आहे, असं म्हणत त्या फोन ठेवून देतात. हे ऐकून दिशाला राग येतो. त्याच वेळेला आदित्यचा फोन आलेला असतो. आदित्यबरोबरचं बोलणं दामिनी ऐकते आणि दामिनी दिशाला फोन करते त्यावेळेला दिशा ऑफिस मधून बाहेर येऊन बोलू लागते. आदित्य हरीशला भेटायला गेला आहे हे दिशा आणि दामिनीला कळतं. हरीश त्यांना भेटता कामा नये नाहीतर त्यांचा पर्दाफाश होईल म्हणून त्या घाबरलेल्या असतात. तर इकडे आदित्य हरीशला आवाज देतो. हरीश आदित्यचा आवाज ऐकून पळू लागतो. आदित्य त्याच्या मागून धावत धावत जाताना दिसतो. तर इकडे पारू सावित्रीला फोन करुन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवण्याबाबत सांगते. मी आता निर्णय घेतला आहे या मंगळसूत्रामुळे सगळ्यांना त्रास होत आहे त्यामुळे आता मी हे मंगळसूत्र काढत आहे. पारू मनावर दगड ठेवून ते मंगळसूत्र काढायला तयार होते. इकडे अहिल्यादेवी आदित्यची काळजी व्यक्त करत देवाजवळ दिवा लावतात आणि आदित्य घरी येईपर्यंत हा दिवा तेवत राहील असं देवासमोर म्हणतात.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे पारू तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून झाडाला बांधून ठेवते तर अहिल्यादेवी दिवा तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात तर इकडे आदित्य धावत धावत ट्रक समोर येतो आणि घरी अहिल्यादेवींचा देवाजवळ लावलेला दिवाही विझतो आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.