‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून मोठ्या दिमाखात नवीन पर्वाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधील १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. आपल्या खास शैलीने व्हिडीओ करणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सूरज चव्हाणच्या एण्ट्रीने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेला सूरज चव्हाणने टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवरील रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. ‘
‘गुलिकत धोका’ असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज हा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळतो. मोबाइलवर व्हिडीओ करणाऱ्या सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याच्या या प्रवासाबद्दल त्याने कालच्या भागात भाष्य केलं. यावेळी त्याने आई-वडीलांचे निधन व त्यानंतर त्याच्या कुटुंबाची झालेली अवस्था यावर भाष्य केलं. यावेळी घरात योगिता, आर्या, पॅडी हे सोफ्यावर बसलेले असताना सुरजने त्याची संघर्ष कहाणी सांगितली.
यावेळी सुरज असं म्हणाला की, “माझी परिस्थिती खूप वाईट होती. माझ्या पप्पांना कॅन्सर झाला होता आणि त्याची गाठ शरीरात उतरली आणि त्यात माझे वडील गेले. पप्पांच्या अचानक जाण्यामुळे आईला वेड लागलं. सतत विचार करुन आणि टेंशन घेण ती तिला वेड लागलं., रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. ती सतत पप्पांचा विचार करत होती आणि यामुळे ती खचून गेली. त्याचवेळी माझी आजी आणि माझी आई गेली, एकीकडे आजीने जीव सोडला आणि एकीकडे माझ्या आईने. त्यांनी एकमेकींची तोंडंही बघितली नाहीत.
आणखी वाचा – कर्क राशीसह ‘या’ राशींना नोकरी मिळण्याची शक्यता, व्यवसायातही होणार नफा, जाणून घ्या…
यापुढे त्याने असं म्हटलं की, “मला आजोबाही नाही. आजीही नाही. आई-वडीलही नाही. फक्त आत्या आणि पाच बहिणी आहेत. एकूण आठ बहिणी होत्या. त्यापैकी काही वारल्या. त्यामुळे मी आठवा कृष्णा आहे. यापुढे पॅडीने त्याला व्हिडीओवर घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? असं विचारलं. तेव्हा त्याने असं म्हटलं की, “मला आधी लोकांनी खूप लुटलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की, मी सुधरावं. मी सुधरलो की त्यांना बरं वाटेल असं ते सगळे म्हणतात”.
आणखी वाचा – नेत्राच्या पोटातून अद्वैतला ऐकू आली विचित्र वीणा व किंचाळी, नेत्रा व बाळ वाचणार का?
दरम्यान, सोशल मीडियावर अतरंगी डान्स व्हिडीओ शेअर करणारा सुरज आता ‘बिग बॉस’च्या घरात काय जादू करणार? त्यांच्या मेहनतीचे फळ त्याला मिळणार का? या घरात त्याचा कितपत निभाव लागणार? तो सगळ्यांना पुरून उरणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.