गेले काही दिवस ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नेत्राचे गरोदरपण दाखवण्यात येत आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीय खूपच आनंदी होते. पण तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच एक अंश आहे हे कळताच सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. आधी तिला याबाबत माहिती नसते. मात्र नुकत्याच झालेल्या भागातून तिच्या पोटातील बाळ हे विरोचकाचे अंश असल्याचा उलगडा झाला आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. त्रिनयना देवीवर विश्वास ठेवत तिच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे नेत्रा व इंद्राणी या परिस्थितीत खचून जात नाहीत. पण आता मालिकेत येणाऱ्या नवीन वळणामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश असल्याने इंद्राणी तिला पोटातली बाळ नष्ट करण्यास सांगत आहे. मात्र नेत्राचे हे पाहिलेच गरोदरपण असल्याने ती गर्भपात करण्यास स्पष्ट नकार देत आहे. रुपाली नेत्राला इंद्राणीविरुद्ध भडकवण्याचे काम करत आहे. इंद्राणी तुझ्या बाळाला जीवे मारेल अशी भीती रुपाली नेत्राला वारंवार घालत आहे. त्यामुळे आता देवीआईच्याच लेकींमध्ये फूट पडत आहे. नुकत्याच झालेल्या भागात इंद्राणी नेत्राला सूप प्यायला देऊन बाळाला मारणार की काय असं दाखवण्यात आले आहे. मात्र फाल्गुनी येऊन ती सूप खाली सांडते आणि नेत्राला ते सूप न पिण्याबद्दल सांगते. इंद्राणीने सूपमध्ये काहीतरी टाकून नेत्राच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संशयावरुन ती नेत्राचे सूप खाली सांडते. काहीही करुन नेत्राच्या पोटातील बाळ नष्ट करण्याचा इंद्राणी प्रयत्न करत आहे. मात्र नेत्राला तिचे पहिले बाळ हवे असल्यामुळे ती हे असं करण्यास नकार देत आहे.
आणखी वाचा – कर्क राशीसह ‘या’ राशींना नोकरी मिळण्याची शक्यता, व्यवसायातही होणार नफा, जाणून घ्या…
अशातच पुढील भागात नेत्राच्या पोटातून अद्वैतला विचित्र वीणाचा आवाज ऐकू येत आहे. मालिकेच्या पुढील भागात नेत्रा अद्वैतला तिच्या पोटात बाळ हालचाल करत असल्याचे सांगते. तेव्हा अद्वैत नेत्राच्या पोटावर कान लावतो. अद्वैतने कान लावताच त्याला पोटातून विचित्र वीणा व हसण्याचे आवाज ऐकू येतात. हे हसणं व ऐकू येणारी विचित्र वीणा ही अगदी विरोचकाशी संबंधितच आहे. विचित्र वीणा ऐकून अद्वैतला धक्काच बसतो आणि तो प्रचंड घाबरतो.
त्यामुळे अद्वैत त्याला ऐकू आलेल्या विचित्र वीणेबद्दल नेत्राला सांगणार का? नेत्राचा त्यावर विश्वास बसेल का? किंवा इंद्राणी, शेखर व राजाध्यक्ष कुटुंबीय यावर काय मार्ग काढणार? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे