Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे दिशा पारुला अहिल्यादेवींच्या नावावर तोकडे कपडे घालायला सांगते. आणि म्हणते, आता मी हिचं असं फोटोशूट करेन की हिचा ब्रँड अँबेसिडर म्हणून असलेला सगळा माज उतरुन जाईल. त्यानंतर पारू ते कपडे घालायला तयार नसते. तितक्यात पारूच्या फोनवर आदित्यचा फोन येतो. तो फोन दिशा उचलते आणि सांगते की, “इकडे सगळं काही ठीक आहे आणि मी असताना इथे तसं काही होणार नाही”. यावर आदित्य म्हणतो, “पण पारूने आईला फोन का केला होता. ती असं कधी करणार नाही. नक्कीच ती काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल”. तेव्हा दिशा सांगते की, “नाही ती काहीच प्रॉब्लेममध्ये नाही आहे. तिचा माझ्यावर विश्वास नाही म्हणून तिने ब्रँडशूटसाठी विचारायला फोन केला होता. पण मी तिला सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितल आहे”, असं म्हणत दिशा फोन ठेवून देते.
आदित्यला इकडे हुरहुर लागून राहिलेली असते. प्रीतम सगळ्यांच्या समोर छान असं प्रेझेंटेशन देतो आणि सगळ्यांची मन जिंकतो. तर प्रीतमला अडलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रिया देते आणि साऱ्यांची मन जिंकून घेते. त्यावेळेला भर मीटिंगमध्ये आदित्यचं लक्ष पारूने केलेल्या फोनकडे लागून राहिलेलं असतं. पारू कोणत्या संकटात तर नसेल ना असाही तो विचार करतो. तर इकडे पारूला दिशा जबरदस्ती तोकडे कपडे घालायला लावते. त्यानंतर पारू जेव्हा खाली येते तेव्हा ती स्वतःवर चादर गुंडाळूनच खाली येते. हे पाहून सगळेजण तिच्यावर हसू लागतात. उंच टाचांच्या चपला घातल्याने तिला नीट चालता येत नाही. त्यानंतर दामिनी व दिशा पारुचा चांगलाच अपमान करतात. दिशा म्हणते, “तू अशी चादर गुंडाळून का आली आहेस. चादर काढ आपण शूट उरकून घेऊ. तू चादरीच्या आत काही घातल आहेस ना?”, असे घाणेरडे प्रश्न ती विचारते, त्यावर सगळेजण हसू लागतात.
तर सावित्री आत्या आणि बाकीच्या नोकर मंडळींना पारूला या अवस्थेत पाहून खूप त्रास होत असतो. पारू ढसाढसा रडत असते. त्यानंतर दिशा स्वतःच पारूच्या अंगावरची चादर काढून टाकते तेव्हा पारूला स्वतःलाच लाज वाटते आणि तिची शरमेने मान खाली जाते. त्यानंतर पारू पडद्याच्या मागे जाऊन लपते तेव्हा दिशा तिला म्हणते की, तुझा ब्रँड अँबेसिडर होण्याचा माज मी आज उतरवते. प्रत्येक चेक हातात मिळतो ना मग आम्ही सांगू तेवढेच तू काम करायचं. हे ऐकल्यावर पारू आणखीनच रडू लागते. त्यानंतर पारू मी हे फोटोशूट करायला तयार नाही, असं सतत म्हणत असते. तेव्हा दिशाचा पारा चढतो आणि दिशा जोरात पारुवर ओरडते आणि तिच्या कानाखाली मारायला जाते.
आणखी वाचा – Video : डीपीने निक्कीला पकडलं, सूरज अंगावर धावून गेला अन्…; Bigg Boss च्या घरात मोठी हाणामारी, माणूसकी हरवली
दिशा कानाखाली मारणार इतक्यातच एपिसोड संपतो. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दिशा पारूच्या कानाखाली मारायला जाते इतक्यात आदित्य दिशाचा हात पकडतो आणि काय सुरु आहे, असं म्हणत दिशाच्या सणसणीत कानाखाली लगावतो. आता मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.