Bigg Boss Marathi Season 5 New Promo : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व सुरु झालं असून हे पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ही अभिनेता रितेश देशमुख याने साकारली आहे. यंदाच्या या नव्या पर्वात स्पर्धक मंडळी हुरहूरीने सहभागी झालेले असून प्रत्येक स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एकापेक्षा एक वरचढ ठरणारे हे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात उत्तम खेळ खेळताना दिसून येत आहेत. तर ‘बिग बॉस’च्या घरात वावर सुरु झाल्यापासून केवळ वादच नव्हे तर प्रेमाचे वारेही वाहताना दिसले.
अगदी ग्रँड प्रीमियरपासून निक्की व अरबाज या स्पर्धकांमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले. अरबाज व निक्की यांची ‘बिग बॉस’च्या घरातील फ्रेंडशिप अनेकांना आवडू लागली. मात्र ही फ्रेंडशिप जास्त काळ टिकली नाही कारण अरबाज व निक्कीमध्ये बरेचदा वादही झालेले पाहायला मिळाले. निक्कीने इतर स्पर्धकांची बाजू घेतल्याने अरबाज तिच्यावर चिडलेला दिसला. मात्र निक्कीने त्यावेळी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. निक्की ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून प्रत्येक स्पर्धकाशी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद घालताना दिसली. त्यामुळे निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
आता यानंतर समोर आलेल्या नव्या प्रोमो मध्ये अरबाज व निक्की यांच्यात पुन्हा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमका हा वाद कशावरुन झाला आहे हे आजच्या भागात समजणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की हात जोडून अरबाजला सांगते, “अरबाज तू जा माझ्याकडे येऊ नको”, बोलते. तर अरबाज व जान्हवी बोलत असतात, तेव्हा अरबाज जान्हवीला बोलतो, “जसा मी तुला ट्रीट करतो तसं मी त्यालाही ट्रीट करणार”.
आणखी वाचा – Video : डीपीने निक्कीला पकडलं, सूरज अंगावर धावून गेला अन्…; Bigg Boss च्या घरात मोठी हाणामारी, माणूसकी हरवली
तर इकडे निक्की वैभवला म्हणते, “अरे त्या मुलीकडे तू कसा जाऊ शकतो ज्या मुलीच्या मी विरोधात गेले होते”. तर जान्हवीला अरबाज बोलतो, “असं असलं तर मी पण गोड गोड बोलेन”. तर इकडे वैभवकडे निक्की रडत असते आणि ती बोलते, “त्याला द्या ट्रॉफी. तो पागल होईल”, असं म्हणते. तेव्हा घनःश्याम व वैभव तिला सावरतात.