मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी हे त्यांच्या शूटिंगनिमित्त बरेचदा घरापासून दूर असतात. कामानिमित्त त्यांना घरापासून दूर राहून शूटिंग करावं लागत. मात्र अनेकदा ही मंडळी वेळ काढत आपल्या प्रियजनांना भेटतात. अशातच पारू मालिकेतील प्रसाद जवादेला भेटण्यासाठी त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अमृता देसमुख थेट साताऱ्याला पोहोचली आहे. ‘पारू’ या मालिकेचं शूटिंग हे सातारा येथे सुरु आहे. या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत असून त्याच्या या मालिकेच्या शुटिंगनिमित्त तो साताऱ्यात वास्तव्यास आहे. सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या घरी अमृताला भेटण्यासाठी जातो तर अमृताही कधीकधी त्याला भेटायला साताऱ्यात जाते. अशातच दोघांनी साताऱ्यातील कास पठारावर त्यांची डेट साजरी केली आहे. (Amruta Deshmukh And Prasad Jawade)
अमृताने तिच्या युट्युब चॅनेलवद्वारे त्यांच्या या साताऱ्यातील डेटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता प्रसादकडे साताऱ्यात गेलेली पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही एकत्र मोमोवर ताव मारत असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. प्रसादच्या सुट्टीनिमित्त अमृता व यो साताऱ्यातील कास पठार येथे गेले होते आणि याची खास झलक तिने युट्यूब वरील व्हिडीओमधून दाखवली आहे. साताऱ्यातील कास पठारवर जाण्याआधी त्यांनी प्रसादए शोधून काढलेल्या मोमोच्या दुकानात थांबले आणि इथे चिकन कुरकुरे मोमो खात त्यांनी त्यांची ही डेट साजरी केली. चिकन कुरकुरे मोमोशिवाय त्यांनी अफगाणी मोमोवरदेखील मस्त ताव मारला.
यावेळी प्रसाद-अमृता यांच्यात काही रोमॅंटिक गप्पाही झाल्या. याची झलकही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. तसंच यावेळी अमृताने प्रसादला एक प्रश्न विचारला की, “समजा मी मोमो असेल तर माझ्यामधलं ते सारण काय असेल?” यावर प्रसाद उत्तर असं देतो की, “व्यंग व प्रचंड प्रेम व निरागसता असलेलं सारण असेल जर तू मोमो असशील तर”. यापुढे अमृता प्रसादविषयी असं म्हणते की, “प्रसाद नावाच्या मोमोचं सारण हे पूर्णत: प्रेमाचं असेल” यानंतर त्यांनी तिथल्या हॉटेलमधील अनेक पदार्थांवर ताव मारला असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’ मराठीमध्ये झळकलेल्या अमृता देशमुखसह प्रसादने लग्न केले. प्रसादच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर प्रसादने लगेचच कामाला सुरुवात झाली. प्रसाद सध्या पारू या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरु आहे. त्यामुळे साताऱ्यातचं प्रसादला राहावं लागत आहे. नेहमी मुंबई-पुणे प्रवास शक्य नसल्याने प्रसादने साताऱ्यातचं एक घर घेतलं असून तो तिथेच राहतो.