‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका पाहणं अधिक रंजक होत आहे. मालिकेतील पारूचा प्रवास प्रेक्षकांना विशेष भावतोय. तर आदित्यचा समजूतदारपणा लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत पारूचा ब्रँड अँबेसिडर होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रँड अँबेसिडरच्या फोटोशूटसाठी पारू सज्ज झाली आहे. (paaru serial new promo)
मालिकेच्या मागील भागात पारू फोटोशूटसाठी तयार नसते. कारण तिला अहिल्यादेवींचे दागिने आणि साडी घालणं पसंत नसतं. मात्र आदित्य आणि प्रीतम तिला तयार करतात. अगदी अहिल्यादेवींची कॉपी असलेल्या या पारूच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अहिल्यादेवीही वंशवत त्याच्या सूनेसाठी असलेले दागिने फोटोशूटच्या निमित्ताने पारूला देतात. हे काही दिशाला पटलेले नसतं. पारू आता अखेर फोटोशूटसाठी तयार झालेली मालिकेत पाहायला मिळत असतानाच प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवणारा एक प्रोमो समोर आला आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये सगळेचजण किर्लोस्कर बंगल्याबाहेर जमलेले दिसत आहेत. त्यावेळी अहिल्यादेवींचे पती अहिल्याला, “तुझ्यासाठी सगळी माणसं सारखीच आहेत. आपला स्टाफ आणि त्याच्या कुटुंबाला तू आपली फॅमिली मानतेस. मान, सन्मान आणि परंपरा याची खरी व्याख्या जिला माहित आहे ती अहिल्यादेवी किर्लोस्कर. आज पारूला गुढी उभी करायची परवानगी देऊन तू हे सिद्ध केलंस की, तुझ्यासाठी फक्त एक चांगल्या माणसाचं मनं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तू अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेस”, असं म्हणत तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
प्रोमोवरुन अहिल्यादेवीने पारूला गुढी उभारण्याची परवानगी दिलेली असते. याचा आनंद पारू व तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तर मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये दामिनी दिशाचे कान भरताना दिसत आहे. दामिनीने दिशाला लाज सोडण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे पारूला मिळणार महत्त्व पाहून दिशाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आता दिशा पारूला तिची जागा दाखवण्यासाठी कोणता नवा डाव आखणार?, आणि दिशेने आखलेल्या नव्या डावातून पारू कशी वाचणार हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.