छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सध्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळाले आहे. नुकताच तिचा व पती विकी जैनबरोबरचा एक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी ती ‘बिग बॉस’ मध्ये जोडीने दिसून आले होते. यामध्ये दोघांमध्ये खूप भांडणं झालेलीदेखील पाहायला मिळाली. त्यानंतर दोघांनी ही माध्यमांना अनेक मुलाखती दिल्या. तसेच शोमध्येही सहभागीही होताना दिसून येत आहेत. (vicky jain on ankita lokhande )
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान अंकिताने सांगितले होते की तिला विकीच्या पैशाचा मोह नाही. तिला स्वप्नांच्या दुनियेत राहायला आवडतं. याबद्दल विकी म्हणाला की, “अंकिताला पैशाशी काहीही देणघेणं नाही. ती खूप निष्काळजी आहे. लक्ष ठेवावे लागते. जेव्हा घरापासून दूर असता तेव्हा पैशांची गरज असते. खरी भांडणं तिथूनच सुरु होतात”.
अंकिताने देखील यावर बोलताना म्हणाली, “मी पैशासाठी कोणाबरोबर राहू शकत नाही. मी खूप स्वप्नात राहते. मी कधीही पैसे बाळगत नाही. विकी बरोबर असेल तर त्याच्याजवळ किंवा आईजवळ असतातच. माझ्या अकाऊंटमध्ये किती पैसे असतात हे मला माहीत नसते”. याचप्रमाणे ‘बिग बॉस’मधील भांडणांवर बोलताना अंकिता म्हणाली की, “मी शोमध्ये कधीही भांडले नाही. शोच्या शेवटी मात्र मी खूप भावनिक झाले होते. त्यावेळी अनेक गोष्टींवरुन आमच्यामध्ये वाद होण्या सुरुवात झाली होती”.
अंकिता व विकीच्या नात्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. दोघांच्या नात्याला सहा वर्ष पूर्ण झाली असून अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोदेखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपण गेली सहा वर्ष एकत्र आहोत. आपल्यामध्ये प्रेमाला सुरुवात कशी झाली हे अजूनही समजले नाही”.
अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘मणिकर्णिका’, ‘बागी ३’ व ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली होती.