कलाकार मंडळी म्हटलं की सिनेसृष्टीत वावरत असताना अनेकदा कलाकार मंडळींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बरेचदा अभिनेत्रींना या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यांनी नेमकं काय कपडे घातले आहेत, वा त्या कोणाबरोबर फिरताना दिसत आहेत अशा अनेक गोष्टींमुळे अभिनेत्री ट्रोल होतात. बरेचदा ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला उत्तर देतात तर काहीवेळा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. मराठी अभिनेत्री बहुतेकदा बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होतात. संस्कृती जपण्याचे त्यांना अनेकदा सल्लेही दिले जातात.
अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीला बोल्ड फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. (Prarthana Behere Troll)
बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होणारी ही अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रार्थनाने चित्रपट व मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अभिनयसृष्टीत छाप पाडली. इतकंच नव्हे तर प्रार्थना तिच्या हटके फोटोशूटमुळे बरेचदा चर्चेत असते. सोशल मीडियावरही प्रार्थना नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या बोल्ड फोटोंची सध्या चर्चा रंगली आहे.
प्रार्थनाने गोवा असं म्हणत काही खास बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवरुन अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तर काही चाहत्यांनी अभिनेत्रीची बाजू घेत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत. एका नेटकऱ्याने प्रार्थनाच्या या पोस्टवर कमेंट करत, “ज्या वेळी लोक ओळखायचे बंद होतात तेव्हा हे असे फोटोशूट करायला लागतात”, असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “शरीर हे दाखवण्यासाठी नाही तर झाकण्यासाठी असते”, असं म्हणत ट्रोल केलं आहे.
इतकंच नव्हेतर चाहते मंडळींनी प्रार्थनाची बाजू घेत सुनावलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत, “तिच्या प्रोफाइलवर ती तिला हवं ते पोस्ट करणार. आता तुम्ही तिला एका व्यक्तिरेखेत अडकवता आहात, पण तिला स्वातंत्र्य आहे. नवीन गोष्टी करण्याचं किंवा हवं तसं जगण्याचं. टीका केली पाहिजे पण सगळीकडेच कशाला?, मराठी कलाकारांना हक्क नाही का असं पोस्ट करण्याचा?”, असं म्हटलं. तर आणखी एका नेटकऱ्याने बाजू घेत, “तू ड्रेसवर छान दिसते. तुझं सौंदर्य तुझा चेहरा आहे. त्यामुळे हे सगळं करुन तुझ्या चाहत्यांच्या मनातील स्थान गमावू नकोस”, असंही म्हटलं.