शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आधी महादेव अन् आता श्रीकृष्ण भक्तीत हार्दिक पांड्या दंग, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबरोबरील सामन्यापूर्वीचा नवा व्हिडीओ व्हायरल

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 11, 2024 | 5:57 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru

मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये चांगलाच चर्चेत आहे आणि त्याचं कारण आहे मुंबईच्या संघाचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्यामुळे. हार्दिक पांड्याने यंदा कर्णधार पदाची धुरा सांभाळली आणि मुंबईच्या चाहत्यांचा राग चांगलाच अनावर झालेला पाहायला मिळाला. रोहित शर्मा सारख्या अनुभवी कर्णधाराला अचानक कर्णधार पद सोडायला लावल्याचा आरोप चाहत्यांनी हार्दिक आणि मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनावर केला. यंदाच्या हंगामात मुंबईला पहिल्या तीन सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे हे सामने मुंबईला गमवावे लागले असे अनेक क्रिकेट तज्ञांचे व चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स या संघाचं उर्वरित सामन्यांमध्ये काय होणार याची चिंता क्रिकेटप्रेमींना आहे. (Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru)

मुंबईला तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर हार्दिक पांड्याने महादेवाचा धावा केला याचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आणि योगायोग म्हणजे त्या नंतर मुंबईला शेवटच्या सामन्यात दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे हार्दिकवर महादेवाची कृपा झाली आणि मुंबईला विजय मिळाला असा काही चाहत्यांचा समज आहे. महादेवाच्या पूजेनंतर आता हार्दिक पांड्याचा भक्तिरसात गुतंलेला आणखी एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय. हार्दिक पांड्या व भाऊ कृणाल पांड्या कुटुंबासह कृष्णभक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओ मध्ये हार्दिक पांड्या स्वतः श्री कृष्ण भजन गाताना पाहायला मिळाला. त्यासह कृणाल पांड्या देखील हे भजन गाताना दिसला. हार्दिकच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत चाहत्यांनी त्याच कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Krunal Himanshu Pandya (@krunalpandya_official)

आणखी वाचा- विकी जैनच्या फक्त पैशांवर प्रेम करते अंकिता लोखंडे, नवऱ्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, “खरी भांडणं…”

आज मुंबई इंडियन्स यांचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसह रंगणार आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये देखील हार्दिक पांड्या आणि संघाला विजय मिळणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. आयपीएल २०२४ या पर्वत मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधार पद हार्दिक पांड्याला देण्यात आलं. आणि मुंबई इंडियन्सच्या संघाला चाहत्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.(Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru)

आणखी वाचा- “शरीर दाखवण्यासाठी नव्हे तर झाकण्यासाठी”, बोल्ड फोटोंवरुन प्रार्थना बेहरेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “असे फोटोशूट…”

रोहित शर्माच्या नाराजीचे काही व्हिडीओज, फोटोज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे पुढच्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार नसल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले. त्यासोबतच लखनऊ सुपर जाईंट्सचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या एका विधानामुळे रोहित शर्मा पुढील हंगामात लखनऊच्या संघाकडून खेळणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत.

Tags: Hardik PandyaMumbai Indians vs Royal Challengers Bengalururohit sharmavirat kohli
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
shoaib ibrahim on dipika kakkar

…अन् दीपिका कक्करने नवऱ्याला रात्रभर ठेवलं घराबाहेर, २० कॉल करुनही दरवाजा उघडलाच नाही, म्हणाला, "बाहेर पायऱ्यांवरच बसून राहिलो आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.