Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, पारू व गणी कायमचे मुंबई सोडून गावाकडे जायला निघालेले असतात. तर मारुतीने ही त्यांना घराबाहेर काढलेलं असतं. मात्र, आदित्यला ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा आदित्य पारूचा पाठलाग करतो आणि तिला खडेबोल सुनावतो आणि आदित्यच पारूला पुन्हा किर्लोस्कर मेन्शनमध्ये घेऊन येतो. मारुतीला पारू व गणीला पाहून खूप खुश होतो तर आदित्य सांगतो, यापुढे पारू व गणी हे घर सोडून कुठेही जाणार नाही आणि ते इथेच राहतील, हा माझा आदेश आहे. त्यानंतर पारू किर्लोस्कर बंगल्यात येते.
पारू अहिल्यादेवींना भेटते तेव्हा अहिल्या देवी म्हणतात, तू इथे?. तेव्हा पारू सांगते की, आदित्य सरांनी मला थांबवून घेतलं आणि त्यांनी मला इथं राहायला सांगितला आहे हा त्यांचा आदेश आहे. हे ऐकल्यावर अहिल्यादेवीही काहीच बोलत नाही आणि किचनचा ताबा पारूकडे देतात आणि तिला जायला सांगतात. त्याच वेळेला अहिल्यादेवींचे अनुष्का कान भरते. तेव्हा अहिल्यादेवी म्हणतात की, आदित्य नेमका असा का वागत आहे, हे अजूनही मला कळत नाही. त्यानंतर पारू प्रीतम व प्रियाला भेटायला जाते. तेव्हा प्रीतम- प्रिया पारूला पाहून खूप खुश होतात.
आणखी वाचा – ऑस्ट्रेलियात पूजा सावंतची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, आई-वडीलही होते उपस्थित, व्हिडीओ समोर
तितक्यात तिथे अहिल्यादेवी येतात आणि प्रीतमवर ऍडशूटची जबाबदारी सोपवतात. अनुष्का व आदित्य यांचं वेडिंग फोटोशूट होणार असतं जे त्यांच्या कंपनीच्या प्रमोशनसाठी ते वापरणार असतात. आदित्य यासाठी तयार नसतो मात्र कंपनीच काम आहे म्हणून आदित्य हे करायला तयार होतो. तर तो अहिल्यादेवींनाही असेही सांगतो की, या ऍडशूटची संपूर्ण जबाबदारी ही स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर घेतील. त्यामुळे यात काही चुका होणार नाही त्याची दक्षता त्या घेतीलच. हे ऐकल्यावर अहिल्यादेवीनाही राग येतो आणि त्या सांगतात की हो ही जबाबदारी माझी असेल आणि मी स्वतः तिथे उपस्थित असेल त्यामुळे काही विपरीत घडण्याचा योग येणारच नाही.
त्यानंतर अनुष्का शूटसाठी तयार होत असते तेव्हा पारू तिथे जाते. पारूचा पडलेला चेहरा पाहून अनुष्काला खूप आनंद होतो. तर इकडे आदित्य तयार झालाय की नाही हे पाहायला पारू येते. तर आदित्य तयार नसतो. आदित्य सांगतो की. मला हे ऍड शूट करायला तयार व्हायचं नाहीये. पण आईचा शब्द आणि कंपनीच्या कामासाठी मी हे करत आहे. यापूर्वी तू आणि मी यासाठी तयार झालो होतो. लोकांनी तुला स्वीकारला आहे. आपल्या दोघांची जोडी किती चांगली दिसते. मला अनुष्का बरोबर या शूटला बसायचं नाही आहे. हे ऐकल्यावर पारूला कळत नाही की आदित्य नेमकं असं का बोलत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार?, अनुष्का पारू या दोघांपैकी कोण बसणार हे सर्व पाहणं रंजक ठरेल.