Jaya Bachchan On her Wedding : अमिताभ बच्चन व जया बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणार आणि पॉवर कपलपैकी एक आहे. या जोडप्याने १९७३ मध्ये लग्नगाठ बांधली आणि तेव्हापासून ते बॉलिवूडमधील सदाबहार जोडप्यांपैकी एक राहिले. मात्र, अमिताभ व जया बच्चन यांचे लग्नही काही सोपे नव्हते. त्यांचे हे लग्न अनेक आव्हानांनी भरलेले होते. विशेषत: १९७० च्या दशकात जेव्हा अमिताभ आणि रेखाच्या अफेअरच्या अफवा इंडस्ट्रीत वणव्यासारख्या पसरल्या होत्या. रेखा व अमिताभ यांच्या अफेअरच्या अफवांदरम्यान, जया तिच्या लग्नाबद्दल अनेकदा बोलली. पण २००८ मध्ये जयाच्या एका मुलाखतीने चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
त्यादरम्यान त्यांनी रेखा व अमिताभ यांच्या अफेअरबद्दल उघडपणे चर्चा केली होती. २००८ मध्ये ‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जया बच्चन यांनी रेखा व अमिताभ यांच्या लिंकअपच्या अफवांवर चर्चा केली होती. त्या म्हणाल्या, “जर कोणी असते तर ते कुठेतरी असते, बरोबर?”. लोकांनी त्यांना पडद्यावर जोडपे म्हणून पसंत केले आणि ते ठीक आहे. मीडियाने आणि नेटकऱ्यांनी अमिताभच्या प्रत्येक हिरोईनशी त्यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला. जर मी ते गांभीर्याने घेतले असते तर माझे आयुष्य नरक झाले असते. आम्ही कठीण गोष्टींपासून बनलो आहोत.
आणखी वाचा – “कॉपी करतो”, अमिताभ बच्चन यांनीच मुकेश खन्नांचं उद्धवस्त केलं करिअर?, शक्तीमानवर नक्कल केल्याचा आरोप
मुलाखतीदरम्यान जया यांनी सांगितले की, त्यांनी या अफवांच्या वादळात आपले लग्न कसे टिकवून ठेवले. जया म्हणाली, “त्यांना एकटे सोडा. तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. मी एका चांगल्या माणसाशी आणि वचनबद्धतेवर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबाशी लग्न केले. तुम्ही खूप सकारात्मक होऊ नका, विशेषत: आमच्या व्यवसायात, जिथे तुम्हाला माहित आहे की, गोष्टी सोप्या होणार नाहीत. अशावेळी तुम्ही कलाकाराला वेड लावू शकता किंवा त्याला पुढे जाण्यास मदत करु शकता. आणि ती व्यक्ती हाताबाहेर गेली तर ती कधीच तुमची नव्हती”.
अमिताभ व रेखा यांच्या रिलेशनशिपच्या अनेक अफवा, बातम्या सिनेविश्वात तुफान व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी विवाह केला. जया बच्चन यांच्याबरोबर विवाह केल्यानंतरही अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा काही थांबल्या नाहीत.