जगातील सर्व कलाकारांचे स्वप्न असते ते म्हणजे ‘ऑस्कर’ मिळवणे. यामध्ये नॉमिनेट होणाऱ्या सदस्यापासून त्यांचे चाहतेही ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. या वर्षीचा पुरस्कार सोहळा लवकरच सादर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्कार १० मार्च रोजी रात्री अमेरिकेमध्ये अनाऊन्स करण्यात येणार आहेत. पण ज्या भारतीयांना लाईव्ह बघायचे आहे त्यांना कधी बघता येणार हे आता जाणून घेऊया. (Oscar 2024 Award )
या वर्षीचा ‘ऑस्कर २०२४’ हा पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. १० मार्चला रेड कार्पेट सेरेमनी असणार आहे. त्यानंतर विजेत्यांची नावं घोषित केली जातील. यावेळी तब्बल तीन वर्षांनी जिमी किमेल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. याव्यतिरिक्त या सोहळ्यामध्ये पुरस्कार प्रदान करणाऱ्यांचीही नावं जाहीर करण्यात आली आहेत.
या वर्षीच्या ऑस्कर प्रदान करणाऱ्यांमध्ये एकाही भारतीय कलाकाराचा समावेश करण्यात आलेला नाही. याआधी अभिनेत्री प्रियंका चोप्रा व दीपिका पदुकोण यांनी पुरस्कार प्रदान करण्यासाठी हजेरी लावली होती. मागील वर्षी दीपिकाने RRR या चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ गाण्याबद्दल माहिती सांगितली होती आणि भारतीय चित्रपटाबद्दल माहिती सांगितली होती. ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.
यावर्षी पुरस्कार प्रदान करणाऱ्यांच्या यादीमध्ये निकोलस केज, अल पचीनो,जेंडया, सॅम रॉकवेल, बॅड बनी, ड्वेन जॉनसन, क्रिस हेम्सवर्थ, जेनिफर लॉरेन्स, एमिली ब्लंट,अरियना ग्रांडे, टीम रॉबिन्स,स्टीव्हन स्पिलबर्ग सहित अनेक कलाकारांचा समावेश आहे.
या वर्षी किलियन मर्फीच्या ‘ओपनहायमर’ चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे तब्बल १३ नामांकनं मिळाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस्तोफर निकोलस यांनी केले आहे. तसेच याव्यतिरिक्त ‘बार्बी’, पुअर थिंग्ज’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ हे चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत आहेत.