सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळालं. अशातच प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. ही अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजाने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सध्या पूजा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. बऱ्याच दिवसांपासून पूजाच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अखेर पूजा २८ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. (Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding)
पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली आहे. पूजा व सिद्धेशच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजा व सिद्धेशने बॉलिवूड स्टाईलने लग्नसोहळा उरकत साऱ्यांच्या नजर वळविल्या. मात्र दोघांनी मराठमोळी परंपराही यावेळी जपली. वरमाला घालतानाचा दोघांचा पारंपरिक लूक विशेष लक्षवेधी ठरला. पूजाने यावेळी नऊवारी साडी व सिद्धेशने शेरवानी परिधान केली होती. तर रिसेप्शनला पूजाने लाल भरजरी साडी नेसली होती तर सिद्धेश काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.
पूजा व सिद्धेश याच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोही चर्चेत राहिले. हळदी, संगीत सोहळ्यांमधील त्यांची धमाल, मस्तीही पाहायला मिळाली. लग्नानंतर पूजा संसारात रमलेली पाहायला मिळाली. दोघांनी घरच्या सत्यनारायण पूजेचा आशीर्वाद घेत व सिद्धिविनायकाचे दर्शन घेत संसाराला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा मूळचा मुंबईचा असला तरी कामानिमित्त तो ऑस्ट्रेलिया येथे राहतो. सध्या सिद्धेश त्याच्या लग्नासाठी भारतात आला होता. तो ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत काम करत आहे.
अशातच आता पूजा व सिद्धेशचा एअरपोर्टवरील एक लूक व्हायरल झाला आहे. लग्नानंतर आता पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियाला जात असल्याचं समोर आलं आहे. यावेळी पापाराझींनी दोघांना स्पॉट केलं. दरम्यान नववधूवराच्या या लूकने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी पूजाने कोणतीही वेस्टर्न स्टाईल न करता मराठमोळी व पारंपरिक पद्धती जपली. पूजा गुलाबी रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली. तर हातात चुडा असलेला तिचा हा नववधूचा लूक पाहून साऱ्यांनी तिचं कौतुक केलं.